NEET Paper Leak : नीट पेपर फुटीप्रकरणी CBI ची पुण्यात मोठी कारवाई; प्राध्यापिकेला अटक

neet paper leak pune professor arrested : NEET पेपरफुटी प्रकरणात मुख्य सूत्रधाराला महाराष्ट्राच्या लातूरमधून अटक केली असतानाच, दुसऱ्या दिवशीच सीबीआयने पुण्यात मोठी कारवाई केली. येथील जीवशास्त्राच्या प्राध्यापिकेला बेड्या ठोकल्या आहेत.

NEET पेपरफुटी प्रकरणात पी. व्ही. कुलकर्णी याला अटक केल्यानंतर तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती उघड झाली होती. त्याला पुण्यातून अटक केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सीबीआयने पुन्हा पुण्यात मोठी कारवाई केली आहे. जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनिषा मांढरे हिला सीबीआयने आज, शनिवारी पुण्यातून अटक केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे मनिषा मांढरेचा NTA च्या तज्ज्ञ पॅनेलमध्ये समावेश होता. पेपर सेट करणे तसंच पडताळणी प्रक्रियेतील त्यांच्या भूमिकेचा गैरवापर करून गोपनीय माहिती उघड केल्याचा संशय आहे. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या चौकशीतून पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अंतर्गत यंत्रणेपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com