Narendra Modi foreign tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आज रवाना झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सहा दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत.15 ते 20 मे दरम्यान पंतप्रधान मोदींचा हा विदेशी दौरा असणार आहे. युरोपीय देशांकडून भारतात गुंतवणूक वाढवण्यासाठी हा दौरा एक मोठी संधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी संयुक्त अरब अमिरातीसाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भात संयुक्त अरब अमिरातीच्या राज्यमंत्री रीम अल हाशिमी यांनी वक्तव्य केलेय. त्या म्हणाल्या की, १५ मे २०२६ रोजी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतासोबतच्या संयुक्त अरब अमिरातीच्या मजबूत संबंधांचा उल्लेख करत हाशिमी म्हणाल्या, "तुम्ही कोणत्याही अमिराती नागरिकाला विचारल्यास, त्यांना भारताशी असलेला त्यांचा काहीतरी संबंध नक्कीच सापडेल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.