Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

Plane Crash in Alaska: अमेरिकेतल्या अलास्कामध्ये विमान कोसळलं. चार्टर विमान कोसळून २ पायलट आणि ६ प्रवाशांचा मृत्यू झाला.
Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू
Plane Crash in AlaskaAI Image
Published On
  • अलास्कामध्ये चार्टर विमान कोसळून ८ जणांचा मृत्यू

  • उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळले

  • मृतांमध्ये २ पायलटचा समावेश होता

  • या विमान अपघाताचा तपास सुरू आहे

अमेरिकेमध्ये विमान अपघाताची मोठी घटना घडली. अलास्कामध्ये चार्टर विमान कोसळलं. या अपघातामध्ये ८ जणांचा दुर्दैवीम मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पालयटचा समावेश आहे. अलास्का राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष क्लिंट जॉन्सन यांनी सांगितले की, विमानात दोन पालयट आणि सहा प्रवासी होते. विमान कोसळ्यानंतर शोध मोहिम राबवण्यात आले. विमानाचे अवशेषासह सर्व प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत.

या चार्टर विमानाने अँकरेज येथून उड्डाण घेतले होते. केप न्यूएनहॅमजवळ हे विमान कोसळले. अलास्का बचाव समन्वय केंद्राने सांगितले की, विमान अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. अधिक तपशील स्पष्ट होताच जाहीर केला जाईल. या विमान अपघातानंतर एकच खळबळ उडाली.

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू
Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

दोन दिवसांपूर्वी लंडनमधील उत्तर वेल्सच्या दुर्गम भागात विमान कोसळले. या विमान अपघातामध्ये नवरा-बायकोचा मृ्त्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख बुधवारी पटली असून ते अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील भारतीय वंशाचे जोडपे होते. केतन स्वाली आणि त्यांच्या बायकोचा मृत्यू झाला. केतन स्वाली हे पीए २८ विमानचे पायलट होते. गेल्या आठवड्यात इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड्स भागातील बर्टन-अपॉन-ट्रेंट येथील टॅटनहिल विमानतळावरून उड्डाण केले होते.

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू
Plane Accident : पर्यटकांचे विमान शेतात कोसळले, १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाझका लाईन्सजवळ भीषण अपघात

विमानात अपघातानंतर त्यामध्ये असलेल्या दोन्ही व्यक्तींना जागीच मृत्यू झाला होता. या विमान अपघाताचा तपास सुरू आहे. ऑनलाइन कंपनी डेटानुसार, केतन स्वाली हे लेस्टर-स्थित अभियांत्रिकी कंपनी 'आर्च युरो ट्रेड लिमिटेड'मध्ये संचालक होते. ज्या कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला आपला उत्पादन व्यवसाय बंद केला होता.

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू
Baramati Plane Crash: बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळलं, थरारक VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com