अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिक : नवनिर्वाचित अपक्ष आमदार गोकुळ गीते हे मुंबईकडे रवाना झाले आहे. ओझर (नाशिक) विमानतळावरून विशेष खाजगी विमानाने ते मुंबईकडे प्रयाण केले. यासाठी VSR कंपनीचे खाजगी विमान सुमारे दुपारी 3:30 वाजता नाशिकमध्ये दाखल झाले. गोकुळ गीते हे ओझर विमानतळाच्या दिशेने रवाना झाले असून, त्यांच्यासोबत शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील आणि माजी खासदार उन्मेश पाटील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, मंत्री उदय सामंत हे विशेष विमानासह नाशिक विमानतळावर पोहोचल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आमदार झाल्यानंतर गोकुळ गीतेंच्या समर्थकांनी त्यांच्या बंगल्याबाहेर जल्लोष केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गाण्यांवर समर्थकांनी ठेका धरत आनंद व्यक्त केला. त्यामुळे गोकुळ गीते यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, गोकुळ गीते हे आजच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. स्वतः गीते यांनीही एका तासात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून अभिनंदन केल्याचे आणि ‘नंदनवन’ येथे भेटण्यासाठी बोलावल्याचे गोकुळ गीते यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्याकडे आणि पुढील राजकीय निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.