Plane Accident : पर्यटकांचे विमान शेतात कोसळले, १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाझका लाईन्सजवळ भीषण अपघात

Peru plane crash Death : पेरूतील प्रसिद्ध नाझका लाईन्सजवळ पर्यटकांना घेऊन जाणारे छोटे विमान कोसळून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे विमान शेतात कोसळून त्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Peru plane crash Death
Peru plane crash DeathSaam TV
Published On

Peru tourist plane crash near Nazca Lines : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. प्रसिद्ध पर्यटनाचे केंद्र असलेल्या 'नाझका लाईन्स' (Nazca Lines) परिसरात पर्यटकांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळल्याने विमानातील १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये परदेशी पर्यटकांसह विमानातील वैमानिकांचा समावेश आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान थेट जमिनीवर कोसळले आणि त्याला भीषण आग लागली.

शनिवारी पेरू देशातील नाझ्का शहराजवळ एका शेतात पर्यटक विमान कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. TOI च्या वृत्तानुसार, मृतांमध्ये पायलट, को पायलटसह ११ प्रवाशांचा समावेश आहे. इका प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या नाझ्का लाइन्सवरून हवाई सफर करत असताना विमान कोसळले. त्या भागात वाळूचे वादळ आल्याच्या दुसऱ्या दिवशी हा अपघात घडला.

Peru plane crash Death
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ₹१५००; जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

नाझ्का अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विमान जवळच्या इका शहरातून निघाले होते. ते पेरूच्या एरोडियाना या विमान कंपनीद्वारे चालवले जात होते. एअरलाइनच्या वेबसाइटनुसार, ही कंपनी गेल्या १४ वर्षांपासून सेसना ग्रँड कॅराव्हॅन विमानांचा वापर करून नाझ्का लाइन्सवरून निसर्गरम्य हवाई सफरी आयोजित करत आहे.

Peru plane crash Death
Maharashtra infrastructure : केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, तब्बल ७ हजार २२ कोटींचा दिला अतिरिक्त निधी

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाने उड्डाण घेतले होते, ते नाझ्का विमानतळाजवळ पोहोचत असताना त्याचा संपर्क तुटला. पेरूच्या व्यापार आणि पर्यटन मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी कोसळलेल्या विमानात ११ परदेशी पर्यटक आणि दोन कर्मचारी होते. सरकारी वृत्तसंस्था एजन्सिया अँडिनाने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात दोन जर्मन, दोन स्पॅनिश आणि सात इटालियन पर्यटक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com