Maharashtra infrastructure : केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, तब्बल ७ हजार २२ कोटींचा दिला अतिरिक्त निधी

Maharashtra receives additional tax devolution funds : केंद्र सरकारने महाराष्ट्राला कर वाटपातून नियमित हप्त्याव्यतिरिक्त तब्बल ७,०२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे राज्यातील पायाभूत सुविधा, विकास प्रकल्प, भांडवली खर्च आणि लोककल्याणकारी योजनांना मोठी गती मिळणार आहे.
Devendra Fadanvis News
Devendra Fadanvis NewsSaamTv
Published On

Central government allocates ₹7022 crore to Maharashtra : राज्यातील रखडलेल्या विकासकामांना आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक मोठा दिलासा दिला आहे. करांच्या वाटपापोटी केंद्र सरकारकडून राज्याला तब्बल ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. नियमित मिळणाऱ्या मासिक हप्त्याव्यतिरिक्त हा निधी देण्यात आल्याने राज्याच्या तिजोरीत मोलाची भर पडली असून, अनेक महत्त्वाच्या लोककल्याणकारी योजनांना आता नवा बुस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे.

राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाची अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरीत केला आहे.राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे.

Devendra Fadanvis News
Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

केंद्र शासनाने ही रक्कम १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसेच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळण्यास आणि निधी नियोजन अधिक सक्षमपणे करण्यास मदत होणार आहे.

Devendra Fadanvis News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याचा मार्ग मोकळा! e-KYC पूर्ण; 'एवढ्या' महिलांना मिळणार लाभ

महाराष्ट्राला प्राप्त ७ हजार 22 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त हा निधी थेट राज्याला हस्तांतरित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील रस्त्यांची कामे, नवीन पायाभूत सुविधा आणि प्राधान्यक्रमानुसार राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com