Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

Tenant police verification rules in Maharashtra : भाड्याने फ्लॅट देताना भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना देणे आणि लीव्ह अँड लायसन्स करार करणे महत्त्वाचे आहे.
Tenant police verification rules in Maharashtra
Tenant police verification rules in MaharashtraSaam TV
Published On

Housing Society Rules Leave and License Agreement : भाडेकरू ठेवलाय पण त्याची माहिती पोलिसांना दिली नाही? अथवा फक्त पैशांची बचत करण्यासाठी भाडेकरार (Rent Agreement) टाळत आहात? तर आताच सावध व्हा. कारण, तुमची ही छोटीशी चूक, निष्काळजीपणामुळे पोलिसांची कारवाई होऊ शकते. तुम्हाला कोर्टाची पायरीही चढावी लागू शकते.

घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना देणे, 'लीव्ह अँड लायसन्स' करार करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक घरमालक या नियमांना गंभीर घेत नाहीत. पण कायदा आणि गृहनिर्माण संस्थांच्या (Housing Societies) नियमांनुसार, असा निष्काळजीपणा केल्यास घरमालकांवर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याशिवाय मोठा आर्थिक दंडही ठोठावला जाऊ शकतो.

Tenant police verification rules in Maharashtra
Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार पुणे ग्रामीण जिल्हयातील घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरु ठेवताना संबंधित भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडे सादर करण्याबाबतचे आदेश पुणे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहे.

Tenant police verification rules in Maharashtra
Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

पोलीस स्टेशनला माहिती देतांना भाडेकरुचे संपूर्ण नाव, सद्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणा-या व्यक्तींचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र आदी कागदपत्रे सादर करावी. माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रगाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील. स्थानिक पोलीस स्टेशनने याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असे सांगण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com