Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Mumbai Crime, Gorai Beach : मुंबईतील गोराई परिसरात पत्नीशी झालेल्या वादाच्या रागातून १० वर्षांच्या मुलाला समुद्रात बुडवून ठार मारल्याचा आरोप असलेल्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Mumbai Crime News, Gorai Beach
Mumbai Crime News, Gorai Beach
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Crime News, Gorai Beach : पत्नीला धडा शिकवण्यासाठी स्वतःच्या १० वर्षांच्या निष्पाप मुलाची समुद्रात बुडवून हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी गोराई पोलिसांनी आरोपी पिता बंटी कालिदास राव (वय ४०) याला अटक केली आहे.

आरोपी बंटी राव हा जुहू चौपाटीवर पर्यटकांचे फोटो काढण्याचे काम करायचा. तो पत्नी, १८ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा युवराज यांच्यासह मढ परिसरात राहत होता. पती-पत्नीमध्ये वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai Crime News, Gorai Beach
Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

२७ जुलै रोजी पुन्हा एकदा झालेल्या वादानंतर चिडलेला बंटी मुलगा युवराजला सोबत घेऊन घरातून निघून गेला. दोघेही रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने आणि बंटीशी संपर्क होत नसल्याने, चिंतेत असलेल्या पत्नीने मालवणी पोलीस ठाण्यात दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी गोराई पोलिसांना 'कोळेवेम बीच'वर एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुलांच्या तक्रारींची पडताळणी केली असता, तो मृतदेह युवराजचाच असल्याचे निष्पन्न झाले.

Mumbai Crime News, Gorai Beach
Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी बंटी रावचा शोध घेतला असता, तो वर्सोवा येथील बहिणीच्या घरी लपून बसल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पत्नीशी झालेल्या वादाच्या रागातून तिला धडा शिकवण्यासाठीच त्याने मुलाला समुद्रात बुडवून मारल्याची धक्कादायक कबुली दिली. मालवणी पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी गोराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com