Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

Friday Horoscope In Marathi : आजचा शुक्रवार हा जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींमुळे हा दिवस सर्व १२ राशींच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींच्या लोकांसाठी हा दिवस प्रचंड यश आणि आर्थिक लाभ घेऊन येईल.
Daily Friday horoscope with zodiac predictions for all 12 signs.
Daily Friday horoscope with zodiac predictions for all 12 signs.Saam TV marathi News
Published On

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ आणि प्रगतीकारक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. फक्त उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. नोकरी आणि व्यवसायात काही लहान-मोठी आव्हाने समोर येऊ शकतात. पण तुम्ही तुमच्या संयमाने त्यावर मात कराल. कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण असतील. नवीन प्रकल्पांवर काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे, पण आर्थिक व्यवहारात थोडा संयम ठेवावा लागेल.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस धावपळीचा आणि मानसिक ताणतणावाचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा बोझा वाढल्याने थकवा जाणवेल. सहकाऱ्यांसोबत किंवा मित्रांसोबत वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. दिवसाच्या उत्तरार्धात जुन्या मित्राची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी शु्क्रवार यश आणि नवीन संधी घेऊन येत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आज एखादी मोठी खूशखबर मिळू शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मान-सन्मान मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. आरोग्य उत्तम राहील, बोलण्यात नम्रता ठेवा जेणेकरून गैरसमज टळतील.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा ठरेल. गुंतवलेल्या पैशांमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण दिसून येईल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी शु्क्रवार सकारात्मक परिणाम देणारा असेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याच्या तक्रारींपासून दिलासा मिळेल. नोकरीमध्ये नवीन आणि जबाबदारीची कामे सोपवली जाऊ शकतात. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

Daily Friday horoscope with zodiac predictions for all 12 signs.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याचा मार्ग मोकळा! e-KYC पूर्ण; 'एवढ्या' महिलांना मिळणार लाभ

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. कामात अचानक काही अडथळे आल्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. घाईघाईत घेतलेला एखादा निर्णय अंगलट येऊ शकतो, त्यामुळे घाई करू नका. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सुसंवाद राखणे गरजेचे आहे. आरोग्याशी संबंधित किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शु्क्रवारचा दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेला असेल. कौटुंबिक आयुष्यात सुख-शांतीचे वातावरण राहील. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अतिशय उत्तम आहे.

धनु (Sagittarius)

धनु राशीसाठी दिवस अतिशय प्रगतीकारक आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील. अध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. आळस बाजूला सारून जर तुम्ही कामावर लक्ष केंद्रित केले, तर आज मोठी यशप्राप्ती होऊ शकते.

Daily Friday horoscope with zodiac predictions for all 12 signs.
शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वात मोठा धक्का; आमदारकी रद्द होणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने खळबळ

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा खर्चाचा आणि धावपळीचा राहील. अचानक उद्भवलेल्या कामांमुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. बजेट कोलमडण्याची शक्यता असल्याने अनावश्यक खरेदी किंवा खर्च टाळा. मात्र, या धावपळीत कुटुंबातील सदस्यांची भक्कम साथ तुम्हाला लाभेल. पैशांच्या देवाणघेवाणीत पारदर्शकता ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक ठरेल. मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तुमचे बिघडलेले काम पुन्हा मार्गावर येईल. मनासारख्या गोष्टी घडल्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. वेळेचे योग्य नियोजन करून काम केल्यास आज तुम्हाला अपेक्षित यश नक्कीच मिळेल.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी दिवस यशाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा योग्य वापर होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक नियोजन व्यवस्थित पार पडेल. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना भावनांच्या भरात वाहून न जाता व्यावहारिक विचाराने निर्णय घ्या.

Daily Friday horoscope with zodiac predictions for all 12 signs.
Plastic Currency : तुमच्या खिशातील कागदी नोटा बंद होणार? आरबीआय आणतेय प्लॅस्टिकच्या नोटा; जुन्या नोटांचे काय होणार?
Daily Friday horoscope with zodiac predictions for all 12 signs.
Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

टीप (Disclaimer) :

या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे ज्योतिषांच्या गृहितकांवर आणि माहितीवर आधारित आहेत. आम्ही या माहितीच्या सत्यतेचा किंवा अचूकतेचा दावा करत नाही. राशीभविष्यात दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com