शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वात मोठा धक्का; आमदारकी रद्द होणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने खळबळ

Amol Khatal, Supreme Court : शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. निवडणूक शपथपत्रातील कथित कर आणि भागीदारीची माहिती लपवल्याप्रकरणी दाखल याचिकेवरील त्यांची विशेष अनुमती याचिका फेटाळण्यात आली.
Amol Khatal, Supreme Court
Amol Khatal, Supreme CourtSaam TV
Published On

Amol Khatal Supreme Court latest news : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? २ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांना मोठा धक्का दिला आहे.

अमोल खताळ यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक शपथपत्रात टॅक्स लपवल्या प्रकरणात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अमोल खताळ यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात होणार आहे.

संगमनेर विधानसभामधील निवडणूक संदर्भात अमोल खताळ यांनी भागीदारी लपवली आहे. त्याबाबत निवड रद्द करावी अशी याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल केली होती. ती याचिका औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळली होती. या विरोधात अमोल खताळ यांनी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. यापुढे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणात सुनावणी होणार आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांचे वकील अमित कारंडे यांनी दिली आहे.

Amol Khatal, Supreme Court
बारामतीत राजकीय भूकंप! राष्ट्रावादीच्या 'या' बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा; ZP मधील प्रकरण भोवले

कराची रक्कम अत्यंत शुल्लक आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करू नये… अशी मागणी खताळ यांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली होती मात्र. कोर्टाने सांगितले की एक रूपया जरी असेल तरी नियमानुसार कारवाई करावी लागेल. निवडणूक याचिका जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर खताळ यांची निवडणूक रद्द होईल. सहा महिन्यांत यावर निकाल येईल, असे अमित कारंडे म्हणाले. खताळ यांची नीलकमल भागीदारी संस्था आहे. त्याचा प्रोफेशनल टॅक्स भरला नव्हता. ५४ हजारांची थकबाकी बाकी आहे. ही माहिती त्यांनी लपविली. प्रत्येकाला प्रोफेशनल टॅक्स भरणे बंधनकारक आहे. पण त्यांनी माहिती लपवली आहे, असेही कारंडे यांनी सांगितले.

Amol Khatal, Supreme Court
Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

नेमकं प्रकरण काय आहे?

अमोल खताळ यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात सरकारी कराची देणी, तसेच नीलकमल भागीदारी संस्थेत भागीदार असल्याचं लपवल्याचा आरोप करत बाळासाहेब थोरात यांनी कोर्टात धाव घेतली. अमोल खताळ यांची निवड रद्द करून त्यांना निवडून आल्याचे घोषित करावे अशी निवडणूक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या विरोधात अमोल खताळ यांनी निवडणूक याचिका दाखल करण्यास दाव्यास कोणतेही कारण नाही या मुद्यावर निवडणूक याचिका रद्द बातल करावी असा अर्ज उच्च न्यायालयात केला होता तो अर्ज उच्च न्यायालयाने फेटळला होता. त्या निकालाच्या विरोधात अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायाल्यात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. ती आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com