Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

Uddhav Thackeray latest news : २००९ च्या डावखरे सीडी प्रकरणात उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून ५ ऑगस्ट रोजी सीआरपीसी कलम ३१३ अंतर्गत जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray latest news
Uddhav Thackeray latest newsSaam TV marathi News
Published On

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

Uddhav Thackeray summoned in the Dawakhare CD case : तब्बल १७ वर्षांपूर्वीच्या 'डावखरे सीडी' प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोर्टाकडून समन्स पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात उद्धव ठाकरे ५ ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील अंतिम जबाबासाठी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराची कथित वादग्रस्त सीडी जाहीर सभेत दाखवल्याचा आरोप ठाकरे यांच्यावर आहे. या खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या असून, आता उद्धव ठाकरेंच्या जबाब नोंदणीनंतर १७ वर्षांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन निर्णयाचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे.

काय आहे प्रकरण?

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात लढत झाली होती. निवडणूक प्रचारादरम्यान कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली होती. या सभेदरम्यान वसंत डावखरे यांची एक कथित सीडी दाखवण्यात आली होती. या सीडीमध्ये डावखरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत सभेत ती दाखवल्यानंतर मोठा राजकीय वाद पेटला होता.

Uddhav Thackeray latest news
पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

या घटनेनंतर वसंत डावखरे यांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खोटी सीडी तयार करून तिचे सार्वजनिक प्रदर्शन करत बदनामी केल्याचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे, शिवसेना उमेदवार आनंद परांजपे, तत्कालीन शिवसेना नेते (सध्याचे उपमुख्यमंत्री) एकनाथ शिंदे तसेच सभेचे आयोजक रमाकांत देवळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Uddhav Thackeray latest news
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याचा मार्ग मोकळा! e-KYC पूर्ण; 'एवढ्या' महिलांना मिळणार लाभ

खटला अंतिम टप्प्यात

हे प्रकरण गेल्या १७ वर्षांपासून कल्याण न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्यात आतापर्यंत सुमारे २९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या असून खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जबाब यापूर्वीच नोंदवण्यात आला असल्याची माहिती सभेचे आयोजक रमाकांत देवळेकर यांनी दिली. आता उद्धव ठाकरे यांचा 'सीआरपीसी' कलम ३१३ (CRPC 313) अंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी ५ ऑगस्ट २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही फौजदारी खटल्यातील एक नियमित न्यायालयीन प्रक्रिया आहे.

त्यानुसार, ५ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे कल्याण न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे यांच्या जबाबानंतर या बहुचर्चित प्रकरणाच्या न्यायालयीन निकालाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Uddhav Thackeray latest news
Plastic Currency : तुमच्या खिशातील कागदी नोटा बंद होणार? आरबीआय आणतेय प्लॅस्टिकच्या नोटा; जुन्या नोटांचे काय होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com