पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

Pandharpur Wari Accident : पंढरपूरची वारी आटोपून वाशिमकडे परतणाऱ्या वारकऱ्यांच्या जीपचा बीड जिल्ह्यातील साळेगावजवळ ट्रॅक्टर आणि कारशी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Pandharpur Wari Accident
Pandharpur Wari Accidentसाम टीव्ही
Published On

Beed Warkari Accident : आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी पूर्ण करून भक्तीभावाने आपल्या गावी वाशिमला परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने भीषण घाला घातला आहे. बीड जिल्ह्यातील केज-कळंब रस्त्यावरील साळेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात एका वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील वारी आटोपून वारकरी जीपने वाशिमकडे परतत होते. बीड जिल्ह्यातील साळेगावजवळ आले असताना जीप, ट्रॅक्टर आणि कार या तीन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसून हा भीषण अपघात झाला.

Pandharpur Wari Accident
Plastic Currency : तुमच्या खिशातील कागदी नोटा बंद होणार? आरबीआय आणतेय प्लॅस्टिकच्या नोटा; जुन्या नोटांचे काय होणार?

अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांनाही तात्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केले. दुर्घटनास्थळावरील पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Pandharpur Wari Accident
ST bus Accident : एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी
Pandharpur Wari Accident
Accident : भाजपच्या बड्या नेत्याचा अपघात, राष्ट्रीय महामार्गावर कारची ट्रकला जोरदार धडक

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात एका वृद्ध वारकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला. तर इतर ११ वारकरी व प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या कळंब आणि अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com