बारामतीत राजकीय भूकंप! राष्ट्रावादीच्या 'या' बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा; ZP मधील प्रकरण भोवले

Mangesh Jagtap, Baramati News : पुणे जिल्हा परिषदेतील आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mangesh Jagtap, Baramati News
Mangesh Jagtap, Baramati News Saam TV marathi
Published On

मंगेश कचरे, बारामती प्रतिनिधी

Baramati news, Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेत दोन दिवसांपूर्वी एका तरुणीने केलेल्या आत्मदहनाच्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश जगताप यांनी गेल्या २० वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली आणि वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. या त्रासाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी पीडितेने पुणे जिल्हा परिषदेच्या बैठकीदरम्यान थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

Mangesh Jagtap, Baramati News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याचा मार्ग मोकळा! e-KYC पूर्ण; 'एवढ्या' महिलांना मिळणार लाभ

बंडगार्डन ते माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग

आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पीडित तरुणीने तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी सुरुवातीला पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनेचे गांभीर्य आणि कार्यक्षेत्र विचारात घेऊन हा गुन्हा पुढील तपासासाठी बारामतीतील माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mangesh Jagtap, Baramati News
Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यातच थेट सत्ताधारी पक्षातील आणि बारामती तालुक्यातील सक्रिय जिल्हा परिषद सदस्यावरच बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मंगेश जगताप यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विरोधकांकडून या प्रकरणावरून जोरदार टीका करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com