Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

Pune School Controversy : पुण्यातील महापालिका शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेची पाद्यपूजा केल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे.
Pune School Controversy
Pune School Controversy साम टीव्ही
Published On

Pune News, BJP Corporator : पुणे शहरातील एका महापालिका शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून भाजपच्या महिला नगरसेविकेचे पाय धुऊन पाद्यपूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने या प्रकाराचा जोरदार निषेध केला आहे. पुण्यातील सुखसागर नगर भागातील महापालिकेच्या शाळेत ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुखसागर नगर येथील महापालिकेच्या शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचे पाय धुतल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Pune School Controversy
Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. शाळा ही शिक्षण, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची ठिकाणे आहेत, ती कोणत्याही व्यक्तीच्या पूजेचे केंद्र बनू नयेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, पेन आणि संविधान असायला हवे, कोणत्याही लोकप्रतिनिधीची पूजा नव्हे, असे त्यांनी नमूद केले.

Pune School Controversy
Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधीचे पाय धुवून घेणे हे घटनात्मक मूल्यांच्या विरोधात असून शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारे आहे, असे मत परदेशी यांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात महापालिकेच्या शाळांमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी शिक्षण मंडळाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com