Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ₹१५००; जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Ladki Bahin Yojana July Installment Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा ₹१५०० हप्ता १५ ऑगस्टपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. १
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanagoogle
Published On

Ladki Bahin Yojana July Installment Date Update News: महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिना सुरू झाल्यामुळे, जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता (Ladki Bahin Yojana July Installment) खात्यात कधी जमा होणार? याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते. आता या हप्त्याच्या वितरणाची संभाव्य तारीख समोर आली आहे.

१५ ऑगस्टपूर्वी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार, १५ ऑगस्टपर्यंत (Before August 15) जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत (Cabinet Meeting Update) या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत सविस्तर चर्चा होऊन अधिकृत निर्णय घेतला जाऊ शकतो.

राज्य शासनाकडून (Maharashtra Government Update) याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा (Official Announcement) झालेली नसली, पण १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना हे आर्थिक गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याचा मार्ग मोकळा! e-KYC पूर्ण; 'एवढ्या' महिलांना मिळणार लाभ

८० लाख महिला अपात्र; १ कोटी ६६ लाख महिलांना मिळणार लाभ

योजनेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ई-केवायसी (e-KYC Verification) आणि पुनर्रचना प्रक्रियेनंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी न केल्यामुळे किंवा अर्जातील त्रुटींमुळे तब्बल ८० लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

त्याच वेळी, राज्यभरात १ कोटी ६६ लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र (Eligible Beneficiaries) ठरल्या आहेत. या पात्र ठरलेल्या सर्व १.६६ कोटी महिलांच्या खात्यात थेट बँक हस्तांतरणाद्वारे (DBT - Direct Benefit Transfer) १५०० रुपयांचा हप्ता पाठवला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana
Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

डीबीटी (DBT) द्वारे थेट खात्यात रक्कम

महिला व बालविकास विभागातर्फे (Women and Child Development Department) ही रक्कम थेट आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात पाठवली जाईल. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, त्यांनाच हा लाभ सुरळीत मिळणार आहे.

जुलैच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख लवकरच जाहीर होईल, मात्र १५ ऑगस्टपूर्वी पैसे जमा होणार असल्याच्या बातमीमुळे महिला वर्गात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com