
नवाज शरीफांच्या लेकीनंतर आता पाकिस्तानचा रशियातील राजदूत मोहम्मद खालिद जमालींनी ही पोकळ धमकी दिलीय. सिंधू नदीचं पाणी अडवलं किंवा वळवलं तर थेट युद्ध पुकारू आणि अणूबॉम्बचा वापर करण्याची दर्पोक्त जमालींनी दिलीय. जमाली नेमक काय म्हणतायत ते पुन्हा पाहुया.
पाकचा हा रशियात बसलेला राजदूत भारताला अण्वस्त्रांची धमकी देतोय. काय तर म्हणे आम्ही पुर्ण ताकदीनं उत्तर देऊ आणि वेळप्रसंगी अणवस्त्रांचा वापर करु. परंतू या पाकिस्तान्यांचे डोकं गुडघ्यात असतं असं का म्हणतात तर त्याचं हेच उत्तर आहे की हा पाकाड्या ज्या रशियात बसलाय. त्याच रशियानं भारताला सर्वात आधी पाकविरोधातील लढाईला पुर्ण पाठिंबा दिलाय. पण मरियम नवाज नंतर हा राजदूत असे एक ना अनेक महत्वाच्या पदावर बसलेले नागरिक इतके भयभीत का झाले त्यासाठी एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्याकडे
पाकच्या फुसक्या फुशारक्या
अणूबॉम्ब सज्जता
भारत पाकिस्तान
सहाव्या स्थानी सातव्या
-----------------------------------
अणुबॉम्बची संख्या
भारत पाकिस्तान
180 170
---------------------------------
हायड्रोजन बॉम्ब
भारत पाकिस्तान
10-20 शून्य
-------------------------------
वॉरशेड निर्माणासाठी युरेनियम
भारत पाकिस्तान
50-100 50-80
इतका बलाढ्या आपला देश आणि तितकाचं शस्त्रसज्ज. कारण जितकं पाकचं बजेट आहे तितकं आपलं संरक्षण विभागाचं बजेट आहे आता पाहा आपला आणि पाकिस्तानचा अणूबॉम्बसंदर्भातील इतिहास.. भारतानं 1974 मध्येच आणि बुद्ध हसला म्हणत अणूबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि जगात अण्वस्त्र सज्जतेत आपलं नाव कोरलं. त्यानंतर 24 वर्षांनी पुन्हा 1998 साली जेव्हा पुन्हा भारतानं 5 अणूबॉम्बची पोखरणमध्ये चाचणी घेतली तेव्हा टरकलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची चाचणी घेत आम्ही पण अण्वस्त्रसज्ज आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय.
आजवर झालेल्या युद्धात एक घाव दोन तुकडे करत भारतानं पाकिस्तानला सपाटून हाणलंय. हे जगजाहिर आहे. त्यामुळे या बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी आपल्या पुर्वजांना किंवा ह्यात असलेल्या बापाला जाऊन विचारावं की 90 हजार कैद्यांना सोडण्यासाठी शिमला करारा करत भुट्टोंना कसं नाक घासत यावं लागलं होतं. आणि जर भारतीय सामर्थ्याचा हा इतिहास आठवत नसेल आणि तरीही भारताकडे हे पाकडे दृष्ट नजरेनं बघत असतील तर आता या पाकिस्तानला इतिहासातच पाठवण्याची वेळ आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.