Hadapsar-Jodhpur Express : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून धावणार नवीन एक्स्प्रेस ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Hadapsar-Jodhpur Express News : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आलीये. पुण्यातून नवीन एक्स्प्रेस ट्रेन धावणार आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Hadapsar-Jodhpur Express
Hadapsar-Jodhpur Express Saam tv
Published On

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी हडपसर –जोधपूर एक्स्प्रेस विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय. तसेच त्यांनी एमजीआर-चेन्नई सेंट्रल–जोधपूर (भगत की कोठी) एक्स्प्रेस विशेष ट्रेनलाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे रेल्वे स्टेशनमधून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार सुनील कांबळे उपस्थित होते.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या समारंभात सामील झाले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीणा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच त्यांनी या नवीन रेल्वे सेवांबद्दल माहिती दिली.

Hadapsar-Jodhpur Express
India Pakistan Tension : पाकिस्तानची झोप उडणार; भारताने घेतला आणखी एक मोठा निर्णय, वाचा

नवीन गाड्यांचे फायदे:

१. महाराष्ट्र/तामिळनाडू आणि राजस्थान दरम्यान थेट प्रवास

२. व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात वाढ, पर्यटन सुलभ होईल.

३. प्रदेशांमधील व्यापार आणि व्यावसायिक संपर्काला प्रोत्साहन मिळेल.

४. प्रवाशांचा, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचेल.

५. सांस्कृतिक संबंधांना चालना मिळेल आणि प्रादेशिक एकात्मता वाढेल.

Hadapsar-Jodhpur Express
Horrific : पहलगामनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना लक्ष्य; आता मच्छिमारांवर जीवघेणा हल्ला

विशेष ट्रेनचे वेळापत्रक

हडपसर (पुणे) - जोधपूर एक्सप्रेस पुणे येथून दिनांक ०३.०५.२०२५ रोजी १७:३० वाजता सुटेल आणि जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी १४:०० वाजता पोहोचेल.

हडपसर आणि जोधपूर दरम्यानच्या नियमित रेल्वे सेवांची माहिती

हडपसर - जोधपूर एक्सप्रेस दिनांक ६.५.२०२५ पासून हडपसर येथून दररोज १९.१५ वाजता सुटेल आणि जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी १५:१० वाजता पोहोचेल.

जोधपूर - हडपसर एक्सप्रेस दिनांक ५.०५.२०२५ पासून जोधपूर येथून दररोज २२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७:१० वाजता हडपसर येथे पोहोचेल.

Hadapsar-Jodhpur Express
Vaibhav Suryavanshi : राजस्थानचा शतकवीर वादाच्या भोवऱ्यात; वैभव सुर्यवंशीचं वय 16 की 14? पाहा व्हिडिओ

नियमित गाड्यांचे थांबे: पुणे, चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, गेरतपूर, अहमदाबाद, महेसाणा, पालनपुर, आबू रोड, पिण्डवाड़ा, जवाई बॉंध, फालना, राणी, मारवाड जंक्शन, पाली मारवाड़ आणि लूनी.

नियमित गाडीमधील संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, २ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनररेटर व्हॅन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com