Tamilnadu Blast : तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, तर दोन जखमी

Tamilnadu Firecracker Company Blast : तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील सत्तूर भागात हा भीषण अपघात झाला. स्फोटाचे कारण अजूनही अस्पष्ट असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
Tamilnadu Firecracker Company Blast
Tamilnadu Firecracker Company BlastSaam Tv
Published On

Tamilnadu Blast : तामिळनाडूमधील फटाके बनवणाऱ्या कारखान्यामध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असताना हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात म्हटले जात आहे. हा स्फोट तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील सत्तूर भागात झाला आहे.

स्थानिक पोलिसांनी या भीषण स्फोटासंबंधित माहिती माध्यमांना दिली. त्या माहितीनुसार, शनिवारी (४ जानेवारी) तामिळनाडूमध्ये एका फटाके बनवणाऱ्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा कारखान्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत होते.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवून बचाव कार्याला सुरुवात केली. त्यांनी जखमींना बाहेर काढून उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दलासह पोलीसही देखील तेथे पोहोचले. त्यांनी बचाव कार्यात मदत करत तपासाला सुरुवात केली. स्फोटाचे कारण अजूनही समोर आलेले नाही.

Tamilnadu Firecracker Company Blast
HMPV Virus: कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक व्हायरस, भारताला धोका किती? आरोग्य मंत्रालयाकडून मोठी अपडेट

स्फोट होण्याच्या काही सेकंदांपूर्वी आगीचा मोठा गोळा कारखान्यातून बाहेर आला. त्यानंतर कारखान्यातील विविध भागांत अनेक छोटे स्फोट झाले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख अजूनही अस्पष्ट आहे. याशिवाय स्फोटामागील कारण शोधण्याचे प्रयत्न स्थानिक पोलीस करत असल्याचे म्हटले जात आहे.

Tamilnadu Firecracker Company Blast
PUBG Train Accident: रेल्वे रूळावर बसून पबजी खेळत होते, रेल्वेनं उडवलं; तिघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com