Horrific : पहलगामनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना लक्ष्य; आता मच्छिमारांवर जीवघेणा हल्ला

Horrific incident : पहलगामनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्यात आलंय. आता मच्छिमारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.
tamil nadu News
tamilnadu Google
Published On

पहलगामनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना लक्ष्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. तामिळनाडूच्या मच्छिमारांवर पुन्हा एकदा श्रीलंकेच्या समुद्री चाच्यांनी हल्ला केला आहे. अक्कराईपेट्टईच्या सेरुधर गावातील ३० मच्छिमार शुक्रवारी बोटीने कोडियाकरईच्या दक्षिण-पूर्व भागात मासेमारी करण्यास जात होते. श्रीलंकेच्या समुद्री चाच्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात १७ मच्छिमार जखमी झाले आहेत. या मच्छिमारांना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सेरुधूर गावातील ३० मच्छिमार एका बोटीने कोडियाकरईच्या दक्षिण-पूर्व भागात मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या वेगात समुद्री चाच्यांची बोट समोर आली. या बोटीत ६ लोक होते. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. या चाच्यांनी मच्छिमारांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात १७ मच्छिमार जखमी झाले. जखमी झालेल्या मच्छिमारांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

tamil nadu News
karuna munde : मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार? करुणा मुंडे यांनी आणखी एक डाव टाकला

श्रीलंकेच्या चाच्यांनी हल्ला केल्यानंतर मच्छिमारांना लुटण्यास सुरुवात केली. या चाच्यांनी मच्छिमारांकडून जीपीएस डिव्हाइस, मासे पकडण्याचे जाळे आणि अन्य वस्तू चोरल्या. मच्छिमारांच्या माहितीनुसार, चाच्यांनी एकूण १० लाखांचं नुकसान केलं. मच्छिमारांचा दावा आहे की, 'चाच्यांनी केलेला हल्ला हा भारताच्या समुद्री सीमेच्या आत केलाय. चाच्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलं आहे.

tamil nadu News
Shocking : ७ वर्षांच्या नरेंद्रनं डोक्यावर मायेनं हात फिरवला, पिसाळलेल्या कुत्र्यानं जबडाच फाडला; १५-२० फूट फरफटत नेलं

माध्यमांशी बोलताना एका मच्छिमाराने राज्य आणि केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली. मच्छिमाराने चाच्यांवर लवकरच कारवाईची मागणी केली आहे. मच्छिमारांनी हल्ल्याच्या निषेधार्थ एक दिवसांचा संप ठेवला आहे. समुद्रात हल्ले होत राहिले तर मच्छिमार अनिश्चिच काळासाठी संप करतील, असा इशारा दिला. दरम्यान, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात श्रीलंकेच्या समुद्री चाच्यांनी तामिळनाडूच्या मच्छिमारांवर रॉडने हल्ला करत लुटमार केली होती. या हल्ल्यात अनेक मच्छिमार जखमी झाले होते.

tamil nadu News
Ladki Bahin Yojana : आली रे आली, खूशखबर आली! एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com