Vishal Gangurde
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी खूशखबर हाती आली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचा हप्त्याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची मंत्री तटकरे यांनी दिली.
आदिती तटकरे यांनी ३० एप्रिल म्हणजे अक्षय्य तृतीयेला बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिली होती.
तांत्रिक अडचणीमुळे लाडकीचा हप्ता बँक खात्यात जमा झाला नाही. त्यानंतर तटकरेंनी नवीन अपडेट दिली आहे.
'येत्या दोन ते तीन दिवसांत बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
आदिती तटकरे यांच्या नव्या पोस्टमुळे लाभार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे.