Bandra Worli Sea Link Extension: मुंबई दक्षिण ते उत्तर टोक फक्त ९ मिनिटात, दहीसरपर्यंतचा प्रवास सुसाट

Mumbai Coastal Road Project 26 January: सागरी किनारा प्रकल्प वांद्रे - वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. २७ जानेवारीपासून हा पुल प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.
Mumbai Coastal road
Mumbai Coastal roadSaam Tv News
Published On

सागरी किनारा प्रकल्प वांद्रे - वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. २७ जानेवारीपासून हा पुल प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे. सोमवारी २७ जानेवारीपासून या पुलावरून दक्षिण मुंबईतून थेट वांद्रेपर्यंत दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे.

तसेच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावरून ये जा करण्याची सुविधा देणाऱ्या ३ मार्गिकांचे लोकार्पणही यावेळी होणार आहे. हा रस्ता २७ जानेवारीपासून मुंबईकरांसाठी सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला होणार आहे.

Mumbai Coastal road
SCSS benefits: ५ वर्षात २४ लाख, या सरकारी योजनेमुळे व्हाल मालामाल; कोणती आहे ही योजना? पाहा एका क्लिकवर

नरीमन पॉईंटपासून दहिसरपर्यंत कमी वेळात अर्थात वेगानं पोहोचण्यासाठी मुंबई किनारा प्रकल्प टप्प्या - टप्प्यानं बांधण्यात येत आहे. कोस्टल रोडची पहिली मार्गिका मागील वर्षी १२ मार्च रोजी खुला झाली होती. त्यानंतर वांद्रेपर्यंतचा टप्पा पूर्ण झाला. या प्रकल्पाची आजपर्यंत ९४ टक्के बांधणी पूर्ण झाले आहे. हा संपूर्ण मार्ग येत्या २६ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकांर्पण झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुला होणार आहे. ज्यामुळे प्रवाशांची वेळेची बचत होईल.

Mumbai Coastal road
Crime News: संशयाचं भूत डोक्यात शिरलं! ७ महिन्याच्या गर्भवतीच्या पोटावर बसून पतीनं केली हत्या

या पुलाची लांबी ८२७ मीटर इतकी आहे. समुद्रावर असलेली लांबी ६९९ मीटर, तर रस्ता १२८ मीटरचा आहे. हा सागरी सेतु पुल बांधण्यासाठी सुमारे २४०० मेट्रीक टन तुळई स्थापन करण्यात आली होती.

सागरी किनारा मार्ग वरळी - वांद्रे जोडण्यासाठी २ पुल बांधण्यात आले आहेत. त्यापैकी दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकर्पण मागील वर्षी झाली. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित दिशांकडे वाहतूक सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com