Crime News: संशयाचं भूत डोक्यात शिरलं! ७ महिन्याच्या गर्भवतीच्या पोटावर बसून पतीनं केली हत्या

Hyderabad Crime News: हैदराबादमध्ये गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे माजी सैनिक पत्नीची हत्या करून तुकडे करत आहे. तर दुसरीकडे आरोपी पतीनं आपल्या गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

हैदराबादमध्ये गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे माजी सैनिक पत्नीची हत्या करून तुकडे करत आहे. तर दुसरीकडे आरोपी पतीनं आपल्या गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. विश्वासघात केल्याच्या संशयावरून पतीनं तिची हत्या केलीय. नंतर अपघाती मृत्यू झाल्याचं भासवलं. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आरोपी पतीनं पत्नी विश्वासघात करत असलेल्या संशयावरून हत्या केली आहे. पत्नीची हत्या करण्यासाठी पतीनं क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ही धक्कादायक घटना १६ जानेवारीला कुशाईगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पत्नी सात महिन्यांती गरोदर असून, उशी तोंडावर ठेवत पत्नीची हत्या केली आहे.

Crime News
Bollywood Death Threats: कपिल शर्मा, राजपाल यादव आणि रेमो डिसूझाला जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानशी कनेक्शन?

१६ जानेवारीला पत्नी घरी झोपली होती. आरोपी पती घरी आला आणि रागाच्याभरात गरोदर पत्नीच्या पोटावर जाऊन बसला. नंतर त्यानं उशी तोंडावर ठेवत पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीनं जीव वाचवण्यासाठी झटापट केली. या झटापटीत तिच्या पोटातून गर्भ बाहेर पडले आणि श्वास कोंडल्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

Crime News
Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा, संजय राऊत यांची पीएम मोदींकडे मागणी

यानंतर आरोपीनं स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह उघडून खोलीला आग लावली. आगीत जळून पत्नीचा मृत्यू झाल्याचं त्यानं बनाव रचला. मात्र, तपासादरम्यान पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी कुशाईगुडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत महिलेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तपासादरम्यान पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी २० जानेवारीला पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com