Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा, संजय राऊत यांची पीएम मोदींकडे मागणी

Sanjay Raut Demands Bharat Ratna Award: बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला ताठ मानाने जगायला शिकवलं. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय.
Sanjay raut on bharat ratna
Sanjay raut on bharat ratnaSaam Tv News
Published On

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. बाळासाहेब ठाकरे आज आपल्यासोबत नाहीत. त्यांनी हिंदू म्हणून अभिमानानं जगण्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला ताठ मानाने जगायला शिकवलं. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केलीय.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९९वी जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानाने जगायला शिकवलं, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी सर्व राजकीय पदं सहकाऱ्यांना दिली होती. स्वत: कधीही कुठल्या पदावर आले नाहीत. बाळासाहेबांनी शिवसेनेत गट कधी तयार केला नाही. मार्केटमध्ये ब्रँडच्या काही ड्यूप्लिकेट गोष्टी येतात, अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केलीय.

Sanjay raut on bharat ratna
Ajit Pawar: चहावाल्याच्या एका वाक्यामुळे गोंधळ उडाला अन्..., अजित पवारांनी सांगितलं जळगाव रेल्वे अपघातामागचं खरं कारण

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायला हवा

'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे माहितीच नाही. प्रतिकूल परिस्थित सामना करून उभं राहण्याचं काम आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. हातामध्ये सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसांसाठी संघर्ष केलाय. या देशात हिंदुत्वाच्या नावानं ढोंग सुरूय. ढोंग करणाऱ्यांना माझं आवाहन आहे, ही ढोंग बंद करा', असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

Sanjay raut on bharat ratna
Pune Crime: पुण्यात कोयत्या गँगची दहशत कायम, बीटी कवडे रोडवर ५० वाहनांची तोडफोड, पाहा CCTV Video

'२०२६ला बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊ शकले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांना भारतरत्न दिला तर तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही गौरव ठरेल', असं संजय राऊत म्हणाले.

पुन्हा एकदा २ शिवसेनेचे २ मेळावे

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज २ शिवसेनेचे २ मेळावे पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं आज अंधेरीत मेळावा होणार आहे. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यासह मुंबईतील बीकेसी परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव साजरा होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणात काय घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com