Hadapsar Assembly Election: हडपसरमध्ये आघाडीत बिघाडी, माजी मंत्री आणि माजी आमदारांनी थोपटलं दंड

Maharashtra Assembly Election 2024: पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाली आहे. प्रशांत जगताप यांना तिकीट मिळाल्यामुळे अनेक नेते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत.
Hadapsar Assembly Election: हडपसरमध्ये आघाडीत बिघाडी, माजी मंत्री आणि माजी आमदारांनी थोपटलं दंड
Maha Vikas Aghadi NewsSaam TV
Published On

सागर आव्हाड, पुणे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून उमेदवाऱ्यांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. अशामध्ये काहींना उमेदवारी मिळाल्यामुळे, तर काहींना न मिळाल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. त्यामुळे नेत्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण पक्षांतर करत आहेत तर काही पक्षाविरोधात दंड थोपाटत आहेत.

पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे. हडपसर मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाली आहे. माजी मंत्र्यांसह माजी आमदाराने दंड थोपाटले आहे. तर अजित पवार गटाकडून बाहेर पडलेले नगरसेवक आनंद अलकुंटे हेही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

राज्यात वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाचा तीढा सुटत आला असतानाच हडपसर मतदारसंघात मात्र उमेदवार निश्चित होताच आघाडीतील मित्र पक्षाचे माजी मंत्री आणि माजी आमदाराने निर्धार मेळाव्यात दंड थोपटून आव्हान दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात सध्या आघाडीत बिघाडीच्या राजकारणावर जोरदार चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हडपसर विधानसभा काँग्रेस समितीच्या वतीने नुकत्याच घेतलेल्या निर्धार मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागांच्या अदलाबदलीत काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन बाळासाहेब शिवरकर यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली. असे न झाल्यास पुरंदरमध्ये आघाडी तर हडपसरमध्ये बिघाडी करू, असा इशारा त्यांनी दिला. मतदारसंघाचे अध्यक्ष दिलीप शंकर तुपे यांनी मेळाव्याचे नियोजन केले होते.

Hadapsar Assembly Election: हडपसरमध्ये आघाडीत बिघाडी, माजी मंत्री आणि माजी आमदारांनी थोपटलं दंड
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत शरद पवारच 'चाणक्य'; सत्ता आल्यास कोणाचा मुख्यमंत्री? पाहा व्हिडिओ

जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार महादेव बाबर यांनी कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपल्या संपर्क कार्यालयावर मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आघाडीच्या जागा वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त करत माजी आमदार बाबर यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची मागणी केली.

Hadapsar Assembly Election: हडपसरमध्ये आघाडीत बिघाडी, माजी मंत्री आणि माजी आमदारांनी थोपटलं दंड
Maharashtra Politics: धनंजय बोडारे यांना उमेदवारी, कल्याण पूर्व मतदारसंघात ठाकरे गटात नाराजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com