Rahul Gandhi News : राहुल गांधींवर शंकराचार्य अविमुक्‍तेश्वरानंद भडकले; हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची केली घोषणा

Rahul Gandhi News update : राहुल गांधींवर शंकराचार्य अविमुक्‍तेश्वरानंद भडकले आहेत. त्यांनी थेट राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची घोषणा केली आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhisaam tv
Published On

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी आता हिंदू धर्माचे सदस्य नाहीत. त्यांना हिंदू धर्मातून सार्वजनिकरित्या बहिष्कृत करण्यात येत आहे, अशी घोषणा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली. शंकराचार्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बद्रीनाथ येथील शंकराचार्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं की, राहुल गांधी यांनी मनुस्मृतीबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या आहेत. राहुल गांधींनी संसदेत म्हटलंय की, अत्याचार करणाऱ्याला वाचवण्याचा फॉर्म्युला संविधानात नसून तुमच्या मनुस्मृतीत आहे'.

Rahul Gandhi News
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी तीन महिन्यापूर्वी राहुल गांधी यांना एक नोटीस पाठवली. यावर भाष्य करतना शंकराचार्य म्हणाले की, 'अत्याचार करणाऱ्याला शिक्षा दिली जात नाही, मनुस्मृतीत कुठं लिहिलं आहे? असा सवाल नोटीसमधून राहुल गांधींना केला. यावर राहुल गांधी यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. त्याचबरोबर त्यांनी माफी मागितलेली नाही'.

Rahul Gandhi News
Jammu Kashmir : ७०० फूट खोल दरीत भारतीय सैन्याचा ट्रक कोसळला; ३ जवान शहीद

शंकराचार्य पुढे म्हणाले, 'एक व्यक्त सातत्याने हिंदू धर्मग्रंथाचा अपमान करत आहेत. त्यावर कोणतंही स्पष्टीकरण देत नाहीत. त्यांना हिंदू धर्मात कोणतंही स्थान दिलं जाऊ शकत नाही. राहुल गांधी यांना मंदिरात विरोध झाला पाहिजे. माझं पुजाऱ्यांना आवाहन आहे की, 'त्यांना कोणतीही पूजा करू देऊ नये. त्यांना हिंदू सांगण्यचाही कोणताही आधार राहिलेला नाही'.

Rahul Gandhi News
Dombivli Crime : भाजपमध्ये जोरदार राडा; माजी नगरसेवकाच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी, डोकी फोडली

शंकराचार्य यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधी हे आधीपासूनच काही वक्तव्यामुळे वादात आहेत. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. मात्र, आता त्यांना थेट धार्मिक संस्थांकडून सार्वजनिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. शंकराचार्यांच्या वक्तव्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com