Saam Tv
होळाष्टक हा शब्द फार कमी लोक उच्चारतात. त्याचा अर्थ बऱ्याच जणांना माहित नसतो.
होळाष्टक हा शब्द होळीशी संबंधीत आहे.
यंदाची होळी १४ मार्च रोजी रंगांची उधळण करून साजरी केली जाणार आहे.
काही भागात होलिका दहनाच्या पाच दिवसांनतंर होळी म्हणजेच रंगपंचमी साजरी केली जाते.
हिंदू पौराणिक कथांनुसार, होळीच्या आधीचे ८ दिवस अशुभ मानले जातात. तुम्ही यावेळेस कोणतेही केलेले शुभ कार्य सफल होत नाही.
या आठ दिवसांना होळाष्टक असे म्हणतात. या दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य करत नाहीत.
कारण राजा हिरण्यकश्यप त्यांच्या मुलाला तो विष्णूभक्त होता म्हणून त्यावर हे ८ दिवस मारहाण करत होता.
त्याचे नाव प्रल्हाद होते. त्यावर हे ८ दिवस नाना प्रकारचे अत्याचार केले होते. त्यावेळेस त्याची बहिण होलिकाद्वारे त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला पण त्या होलिकेचा अंत झाला.