
लाडकी बहीण योजनेवरून उलट सुलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे. विरोधकांच्या दाव्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, विरोधकांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ते साताऱ्यात बोलत होते.
महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन संपन्न झालं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'महोत्सवातील लाडके बहीण, लाडके भाऊ आणि पर्यटकांचे मी स्वागत करतो. शंभुराज देसाई यांनी अत्यंत कमी दिवसांमध्ये तयार केली, पण ही तयारी अत्यंत उत्तम केली आहे. तयारीसाठी तीन दिवस कमी पडत आहेत. पर्यटन महोत्सव खरोखरच एक चांगली कल्पना आहे'.
शिंदे पुढे म्हणाले, 'फूड फेस्टिवलमध्ये अनेक खाद्यपदार्थ पाहिले. बचत गटांना कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म उभा करून देणे गरजेचे आहे. यामधून लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचा स्वप्न पूर्ण होईल. जपानवरून आलेले पाहुण्यांसोबत एकनाथ शिंदे हे इंग्लिशमधून महाबळेश्वर विषयी माहिती सांगत आहे. या महाराष्ट्रामध्ये खूप पोटेन्शिअल आहे'.
'पर्यटनाला कृषीचा आणि उद्योगधंद्याचा दर्जा दिल्यामुळे पर्यटन आणखी वाढेल. या महोत्सवात सर्व काही आहे. मी गावी गेलो की, नाराज झाले. हेलीकाप्टरने गावी गेले, जाऊन शेती करतायेत असे आरोप करतायेत, असे ते म्हणाले.
यावेळी शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं. 'लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. विरोधकांचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे होते. आमचे सरकार जे काही बोलतं, ते करून दाखवतं, असे ते पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.