Shocking : चिखलाने माखलेला, दगडात अडकलेला अन् अख्ख गाव जागी; सोलापुरात विहिरीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

Solapur Shocking News : सोलापुरात विहिरीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले आहे. चिखलाने माखलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह सापडले.
Solapur News
Solapur boramaniSaam tv
Published On

सोलापुरातून धक्कादायक घटना समोर आलीये. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बोरामणीतील विहीरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. १० तास उलटल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. दोघांचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर जवळपास १० तासांपासून सुरू असलेले शोधकार्य थांबवण्यात आले.

Solapur News
Baramati News : बारामती खून प्रकरणी मोठी अपडेट; चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह 12 जणांना जन्मठेप, काय आहे संपूर्ण प्रकरण?

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीमध्ये विहिरीचा कठडा कोसळून २ मुले बुडाले. विहिरीत बुडालेल्या २ मुलांचे मृतदेह तब्बल १० तासांनी सापडले. मागील १० तासांपासून तहसील प्रशासन, पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग एकत्रितपणे शोधकार्य करत होते.

Solapur News
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींची एप्रिलच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा संपणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

नेमकं काय घडलं?

सोलापुरात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान पाच ते सहा मुलं विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते. याच विहिरीचा कठडा कोसळून दोन मुले विहिरीत अडकली होती. दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीमध्ये विहीर कोसळून बुडालेल्या मुलांच्या शोधमोहिमेला यश मिळालं.

Solapur News
ATM Charges : सर्वसामान्यांना झटका; एटीएममधून पैसे काढणे महागणार, कारण... VIDEO

8 ते 10 तासांच्या शोध मोहिमेनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. 30 ते 40 फूट खोल विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने शोध मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता. पहिल्या मुलाचा मृतदेह सापडताच मुलाच्या नातेवाईकांनी टाहो फोडला होता. त्यानंतर दुसऱ्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी टाहो फोडला.

Solapur News
Pahalgam Attack : उट्ट काढण्याची संधी, नकाशावरून सगळं संपवूनच टाकू; प्रसिद्ध अभिनेत्याची पाकिस्तानविरोधात डरकाळी

मोर्बे धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

परीक्षा संपली आणि सुट्टया सुरु झाल्यामुळे धरणावर फिरायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा रायगडमधील मोर्बे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो इंजिनीअरिंगला शिकत होता. परीक्षा संपल्याने मित्रांसोबत खालापूर तालुक्यातील मोर्बे धरणावर फिरायला गेला होता. धरणाच्या पाण्यात पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरिक्षक विशाल पवार अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com