Maharashtra Politics : दहशतवादाविरोधात एकत्र या; प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरातांना आवाहन, मविआ काय भूमिका घेणार?

Prakash Ambedkar News : ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरातांना आवाहन केलं आहे. दहशतवादाविरोधात एकत्र येण्यसाठी आंबेडकरांनी आवाहन केलं आहे.
Prakash Ambedkar News
Maharashtra Politics Saam tv
Published On

मुंबई : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारताने संघटितपणे प्रत्युत्तर दिले पाहिजे. यासाठी दहशतवादाविरोधात कठोर आणि पारदर्शक कारवाईची मागणी करत २ मे रोजी मुंबईत हुतात्मा स्मारकावर प्रतिकात्मक निषेध आयोजित करण्यात आला आहे. यात राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Prakash Ambedkar News
Pahalgam Attack : पाकिस्तानी सैन्यात भयकंप; लष्कर प्रमुखाच्या विरोधात 5000 जवानांचा बंडाचा झेंडा, नेमकं काय घडलं? VIDEO

पहलगाम हल्ल्याचा निषेध मुंबईतील फोर्ट भागातील हुतात्मा स्मारक येथे दुपारी २ वाजता होणार आहे. या निषेधात सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. या निषेधासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना विशेष निमंत्रण दिले आहे.

प्रकाश आंबेडकरांची सोशल मीडियावरून खास पोस्ट

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट करत दोघांना आवाहन केलंय. 'तुमच्या उपस्थिती आणि आवाजाद्वारे आपण सरकारला पाकिस्तान व दहशतवादाविरोधात निर्णायक पावले उचलण्याची मागणी करूया,' असे प्रकाश आंबेडकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे

Prakash Ambedkar News
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींची एप्रिलच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा संपणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

पहलगाम हल्ल्यात मृतांचे स्मृतीस्थळ उभारण्याची प्रकिया सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. या तिघांचे स्मृतीस्थळ डोंबिवली पश्चिम येथील भाग शाळा मैदानामध्ये स्मृतीस्थळ उभारण्याची प्रकिया सुरू झाली आहे . 4 मे रोजी या स्मृतिस्थळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली मनपा शहर अभियंता यांनी दिली आहे.

Prakash Ambedkar News
Chhaya Kadam : छाया कदम गोत्यात; रानडुक्कर, घोरपड खाणं पडलं महागात, प्रसिद्धी अभिनेत्री चौकशीच्या फेऱ्यात?

आमदार रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पत्र व्यवहार करून कश्मीरमध्ये मृत झालेल्या तिघांची स्मृतिस्थळ उभारण्यासाठी मागणी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तातडीने ठराव तयार करून मंजूर प्रक्रियेमध्ये ठेवला आहे. येत्या चार मेपर्यंत ठराव मंजूर करण्यात येणार असून त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com