Politics News: अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना, भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया

UP Politics Heats Up Over Sapa Poster: उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या एका पोस्टरमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरवरून भाजपने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
UP Politics
UP PoliticsSaam
Published On

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या एका पोस्टरमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धा चेहरा आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा अर्धा चेहरा एकत्र दाखवण्यात आला आहे. या प्रकाराचा अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाने तीव्र निषेध करत कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, भाजप आणि बहुजन समाज पक्षानेही या घटनेविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

राजकीय प्रतिक्रिया

पोस्टरवरील फोटो पाहुन बसपाच्या नेत्या मायावती चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी या पोस्टरचा निषेध करत एक ट्वीट सोशल माध्यमांमध्ये शेअर केलं आहे, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत आहोत, याची जाणीव समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला नाही. त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी, अन्यथा त्यांच्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू', असं मायावती म्हणाल्या.

UP Politics
Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, ड्रग्ज देऊन बलात्कार, टोळीनं तरूणींचे प्रायव्हेट VIDEO शेअर करत..

उपमुख्यमंत्री बृजेश पाठकांचा संताप

या पोस्टरविरोधात भाजप नेत्यांनीही संताप व्यक्त केला असून, उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'समाजवादी पक्षाची मानसिकता खराब झाली आहे. त्यांनी यापूर्वीही बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मेडिकल कॉलेजमधून हटवले होते. आता पोस्टरच्या माध्यमातून पुन्हा एकदा अपमान केला जातोय', असं म्हणत बृजेश पाठक यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला.

UP Politics
SSC- HSC Result: दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली! बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती

बाबासाहेबांच्या नखाची सुद्धा सर नाही

भाजप खासदार बृजवाल यांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. 'अखिलेश यादव स्वत:ला आंबेडकर समजतात, पण त्यांना बाबासाहेबांच्या नखाची सुद्धा सर नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला अखिलेश यांनी अर्धा फोटो लावून डॉ. बाबासाहेबांचा अपमान केला आहे, समाजवादी पक्षाने माफी मागावी', अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com