Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरातील 'या' भागात पाणीकपात, वाचा सविस्तर

Pune Water Cut update : पुणेकरांनो पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कारण आता पालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
pune News
pune Saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुणे शहराच्या उपनगरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुण्यात पाच मेपासून पाणी कपात सुरू होणार आहे. शहराला लागणारे पाणी मर्यादित असल्याने पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे पुणे महापालिकेकडून शहरात पाण्याची कपात करण्यास सुरूवात केली आहे.

दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरापासून ही सुरूवात करण्यात आलीये. पालिकेच्या निर्णयानुसार या भागात आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. सदर परिसरामध्ये पालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, उपलब्ध असलेले पाणी कमी पडत आहे.

यामुळे कात्रज परिसरात मोठया प्रमाणात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे सर्व भागात पुरेसे पाणी देण्यासाठी आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण पुण्यातील काही भागात चक्राकार पद्धतीने पाणी दिले जाणार आहे.

वार आणि पाणी पुरवठा बंद असणारा भाग

सोमवार

बालाजीनगर : सर्वे नं २३, गुलमोहर सोसायटी, पवार हाॅस्पीटल परिसर, बालाजीनगर, श्रीहरी सोसयाटी, गुरूदत्त सोसायटी, साईकृपा सोसायटी

कात्रज : चौधरी गोठा, उत्कर्ष सोसायटी परिसर, गुजर वस्ती, कात्रज तलावा लगतचा पूर्व भाग,

कोंढवा : सावंत काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, साईनगर, गजानन महाराज नगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा सोसायटी

मंगळवार

सनसिटी : महालक्ष्मी सोसायटी, मधुकर हॉस्पीटल परिसर, विठ्ठलवाडी, विठठलनगर, सनसिटी संपूर्ण, माणिकबाग, सनसिटी परिसर, समर्थ नगर

जुनी धायरी : पारी कंपनी रस्ता, संपूर्ण जुनी धायरी, उज्वल टेरेस, बारंगणी मळा, दळवीवाडी

कात्रज : नवीन पोस्ट आॅफिसचा भाग, राजस सोसायटी परिसर, निरंजन सोसायटी, कमला सिटी, स्टेट बॅंक सोसायटी

कोंढवा : हब टाऊन सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, प्रभाग ३७, कामठे पाटील नगर, खडीमशिन चौक, सिंहगड कॉलेज

pune News
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींची एप्रिलच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा संपणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

बुधवार

वडगाव हिंगणे : जाधवनगर, खोरड वस्ती, सुदत्त संकूल, आंनद विहार, राजीव गांधी वसाहत, वडगाव बुद्रूक, वडगाव हिंगणे, पेरूची बाग, धावडी, जाधवनगर, वडगाव गावठाण, समर्थ नगर, संतोष मागील परिसर, हिंगणे, महादेवनगर

कात्रज : आंबामाता मंदीर पाठीमागील परिसर. वघजाईनगर, भांडेआळी, सुखदा-वरदा सोसायटी, सम्राट टॉवर, शिवशंभोनगर गल्ली १ , माऊलीनगर, सिल्वहर ओक सोसायटी, बलकवडे नगर

कोंढवा : शिवशंभोनगर ( कात्रज- कोंढवा रस्ता) स्वामी समर्थ नगर, सुखसागर नगर २

pune News
India Pakistan tension : पाकिस्तानचा बुरखा फाटला; कराचीजवळील अण्वस्त्र केंद्राची पोलखोल, पाहा स्पेशल रिपोर्ट

धनकवडी : आदर्शनगर, प्रतिभानगर तळजाई पठार सर्व्हे नं.४,५,७,८, गणेशदत्त सोसायटी, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहारी सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सर्वे. नं. ३४,३५,३६,३७सह्याद्रीनगर, टिळकनगर, सावरकर सोसायटी, आंबेडकर वसाहत, ग्रीन पार्क, अविष्कार सोसायटी, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १, दाते बसस्टॉप, सर्वे नं. २,३ धनकवडी गावठाण

कात्रज : शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर (डोंगर भाग) निलया सोसायटी, महादेवनगर भाग – २, सुखसागरनगर भाग १, मॅजेस्टीक टॉवर, रोहितदास महाराज मठ

कोंढवा : सावकाशनगर, काकडे वस्ती, वृंदावननगर, शिवशंभोनगर (काकडे वस्तीचा भाग) गोकुळनगर (रस्त्याचा व डोंगर भाग)

pune News
Pahalgam Attack : उट्ट काढण्याची संधी, नकाशावरून सगळं संपवूनच टाकू; प्रसिद्ध अभिनेत्याची पाकिस्तानविरोधात डरकाळी

शुक्रवार

आंबेगाव पठार : त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर, आंबेगाव पठार सर्वे नं. १५ ते सर्वे नं. ३०, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं. १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर

कात्रज : मोरे-निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर.आगम मंदिर संतोषनगर अन्जलीनगर, दत्तनगर , जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर, वंडर सिटी परिसर, साईनगर , वसवडेनगर, पोलीस कॉलनी, जाधवनगर, जोगेश्वरीनगर

कोंढवा: मरळ नगर, कांतिन अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोंढवा बु. (भाऊ कामठे गल्ली) कपिलनगर, लक्ष्मीनगर संपूर्ण.आचल फार्म, कोंढवा बु. (गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिल व्यू सोसायटी

pune News
Cricketer Shivalik Sharma News : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा; पोलिसांकडून अटक होणार?

शनिवार

कात्रज : कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखील नवीन वसाहत कात्रज

कोंढवा : काकडेवस्ती गल्ली क्रमांक १ शिवशक्ती नगर, अशरफ नगर गल्ली क्रमांक ७,८ आणि ११, राजीवगांधी वसाहत संर्पूण, चैत्रबन वसाहत, कुष्णनगर, झांबरे वस्ती, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क

रविवार

कात्रज : महादेवनगर भाग १ , आनंद नगर, विद्या नगर, महावीर नगर

कोंढवा : आंबेडकर नगर संपूर्ण, पुण्यधाम आश्रम रस्ता,हगवणे नगर, अशरफ नगर पूर्ण, शिवप्लाझा पिसोळी रस्ता, एच अॅड एम सोसायटी, पारगे नगर, १५ नंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com