Cricketer Shivalik Sharma News : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा; पोलिसांकडून अटक होणार?

Cricketer Shivalik Sharma News update : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडू कायदेशीर अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात अत्याचाराच गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Shivalik Sharma
Cricketer Shivalik SharmaSaam tv
Published On

आयपीएलमधील टीम मुंबई इंडियन्सचा माजी युवा क्रिकेटपटू शिवालिक शर्माबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. राजस्थान पोलीस शिवालिक शर्माच्या शोधात आहे. युवा क्रिकेटपटू शिवालिक शर्मा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. शिवालिक शर्माच्या विरोधात राजस्थानच्या जोधपूरमध्ये अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाईसाठी शिवालिक शर्माचा शोध सुरु केला आहे.

बडोदाचा राहणारा शिवालिक शर्माच्या विरोधात जोधपूरच्या कुडी भगतासनी हौसिंग बोर्ड पोलीस स्टेशनमध्ये अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा नोंदवल्याने शिवालिक शर्माला अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनीही अटक होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.

Shivalik Sharma
Rahul Gandhi on Caste Census : 'जातनिहाय जनगणनेचं स्वागत, पण...'; राहुल गांधींच्या मोदी सरकारकडे प्रमुख ३ मागण्या

पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की, 'शिवालिक शर्माने लग्नाचं प्रलोभन देऊन तरुणीवर अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. शिवालिक शर्माने साखरपुडा होण्याआधी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याने अनेक वेळा पीडित तरुणीच्या जोधपुरातील घरात अत्याचार केले.

Shivalik Sharma
Pahalgam Attack : उट्ट काढण्याची संधी, नकाशावरून सगळं संपवूनच टाकू; प्रसिद्ध अभिनेत्याची पाकिस्तानविरोधात डरकाळी

कुडी पोलीस स्टेशनचे प्रभारी हमीर सिंह यांनी सांगितलं की, 'पीडित तरुणीच्या तक्रारीच्या आधारावर आयीपीएलचा खेळाडू शिवाली शर्माच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. शिवालिक शर्मा आयपीएलमध्ये बडोदा आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे.

Shivalik Sharma
Chhaya Kadam : छाया कदम गोत्यात; रानडुक्कर, घोरपड खाणं पडलं महागात, प्रसिद्धी अभिनेत्री चौकशीच्या फेऱ्यात?

पोलीस यंत्रणा अलर्ट

पोलिसांनी पीडित तरुणीच्या सुरक्षेसाठी पावले उचलले आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाईसाठी सुरुवात केली आहे. शिवालिक शर्माने लग्नाचं प्रलोभन देऊन साखरपुड्याच्या आधी शारीरिक संबंध ठेवले. या कृत्यानंतर तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवालिक शर्माला अटक करण्याची तयारी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com