Mumbai Indians च्या खेळाडूंची एकच धावपळ, रोहित शर्मा सर्वांना ओरडून ओरडून बोलवताना दिसला; Video Viral

Mumbai Indians IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ दिल्लीला पोहोचला आहे. सराव करत असताना अचानक वादळ आल्याने त्यांची धावपळ झाली. याचा व्हिडीओ मुंबईच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
Mumbai Indians Rohit Sharma
Mumbai Indians Rohit Sharmax
Published On

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली आहे. मुंबईने एकूण पाच सामने खेळले आहेत. त्यातील एकाच सामन्यात मुंबईचा विजय मिळवला आहे. उरलेल्या चार सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. मुंबई १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्ससमोर लढत देणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ दिल्लीला पोहोचला आहे. पण त्याआधीच मुंबई इंडियन्सवर अनपेक्षित संकट आले आहे.

मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिल्लीच्या स्टेडियमवर सराव करण्यासाठी गेले होते. सराव सत्र सुरु असताना अचानक वादळ आले. अनपेक्षित वेळी पाऊस पडायला सुरुवात झाल्याने मुंबईच्या खेळाडूंची एकच पळापळ झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे सराव सत्र थांबवण्यात आले. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा हसत-हसत खेळाडूंना माघारी बोलावत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

Mumbai Indians Rohit Sharma
CSK मध्ये वादाची ठिणगी? धोनी कर्णधार होताच ऋतुराजचं मोठं पाऊल, सोशल मीडियावरील कृतीतून चित्रच समोर आलं

मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये निराशाजनक ठरत आहे. मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल १० वर्षांनंतर मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळताना विजय मिळवला. रोहित शर्माचा फॉर्म सध्या काळजीचा विषय ठरत आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यामुळे मुंबईची फलंदाजी टिकून आहे. हार्दिक पंड्या आणि नमन धीर शेवटच्या ओव्हर्समध्ये चांगला खेळ करत आहेत.

Mumbai Indians Rohit Sharma
Virat Kohli : ३०० कोटींची ऑफर विराट कोहलीने नाकारली, बऱ्याच वर्षांपासूनचे असलेले संबंध तोडले; जाणून घ्या नेमकं कारण

जसप्रीत बुमराह परतल्याने संघाला गोलंदाजी विभागात ताकद मिळाली आहे. हार्दिक पंड्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिल्ली विरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे.

Mumbai Indians Rohit Sharma
MS Dhoni : तो पाहा आला.. केकेआरच्या कोचला एमएस धोनी म्हणाला गद्दार, मैदानात नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com