Jammu Kashmir : ७०० फूट खोल दरीत भारतीय सैन्याचा ट्रक कोसळला; ३ जवान शहीद

Jammu Kashmir Latest News : जम्मू-काश्मीच्या रामबनमध्ये सैन्याचं वाहन ७०० फूट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत ३ जवान शहीद झाले. श्रीनगरला चाललेला ट्रक बॅटरी चश्मा भागात दरीत कोसळलं.
Jammu Kashmir news
Jammu Kashmir Saam tv
Published On

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात रविवारी भीषण दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचा ट्रक ७०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. रामबनमधील भीषण दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. नॅशनल हायवे-४४ बॅटरी चश्माजवळ सकाळी ११.३० वाजता दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचा ट्रक जम्मूहून श्रीनगरला निघाला होता.

Jammu Kashmir news
India Pakistan Tension : पाकिस्तानची झोप उडणार; भारताने घेतला आणखी एक मोठा निर्णय, वाचा

भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस, सैन्य आणि स्थानिक स्वयंसेवकांनी एकत्र मिळून बचाव कार्य सुरु केले. भीषण अपघातात वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या ट्रकमध्ये तीन सैनिक होते. दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला.

Jammu Kashmir news
Dombivli Crime : भाजपमध्ये जोरदार राडा; माजी नगरसेवकाच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी, डोकी फोडली

अमित कुमार, सुजीत कुमार आणि मन बहादूर असे शहीद झालेल्या सैन्याचे नाव आहे. त्यांचे मृतेदह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'दुर्घटनेनंतर वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. सैन्य आणि प्रशासनाकडून जवानांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Jammu Kashmir news
Ajit Pawar News : 'मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण...'; अजित पवार मनातलं बोलून गेले, पाहा व्हिडिओ

कसा झाला अपघात?

भारतीय लष्काराचा ट्रक रविवारी सकाळी ताफ्यातून श्रीनगरला निघाला होता. भारतीय लष्कराचा ताफा रामबन जिल्ह्यात आला. राष्ट्रीय महामार्ग-४४ पर्यंत पोहोचल्यानंतर ताफ्यातील एक ट्रक ७०० फूट दरीत कोसळला. चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्याने ट्रक ७०० फूट दरीत कोसळला. भीषण अपघाताची घटना रविवारी सकाळी ११.३० वाजता घडली. या दुर्देवी घटनेत ३ जवान शहीद झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com