Dombivli Crime : भाजपमध्ये जोरदार राडा; माजी नगरसेवकाच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी, डोकी फोडली

Dombivli Crime News : डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित राडा झाला. दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारीची घटना घडली.
Dombivli
Dombivli CrimeSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Dombivli News : डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरात काल रात्रीच्या सुमारास भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या आजी-माजी समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. तलवारी, लोखंडी रॉड, दगडांनी दोन्ही गटाकडून मारहाण करण्यात आली. या राड्यात तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीसानी दोन्ही गटांनी दिलेला तक्रारीनुसार दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करत तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. भाजप नगरसेवकांच्या आजी-माजी समर्थकांमध्ये झालेल्या या राड्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे

Dombivli
Nagpur : पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाही, कारण...; विदर्भ पेट्रोल असोसिएशनचा मोठा निर्णय

भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे हे शनिवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्त एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले होते. यावेळी त्याठिकाणी मेघराज तुपांगे आले. तुपांगे आणि म्हात्रे यांचे सुरक्षा रक्षक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. याप्रकरणी या सुरक्षा रक्षकाने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मेघराज तुपांगे हे काही वर्षांपूर्वी भाजपचे विकास म्हात्रे यांचे समर्थक होते. मात्र काही कारणावरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले.

Dombivli
karuna munde : मंत्रिपदानंतर धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार? करुणा मुंडे यांनी आणखी एक डाव टाकला

मेघराज तुपांगे आणि त्याच्या साथीदारांचा काल रात्रीच्या सुमारास विकास म्हात्रे यांचे समर्थक प्रमोद चव्हाण आणि महेश चव्हाण यांच्यात पुन्हा जोरदार राडा झाला. विकास म्हात्रे यांचे समर्थक प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण मित्रांबरोबर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गप्पा मारत होते. त्यावेळी मोटर सायकलवरून आलेल्या मेघराज तुपांगे, उमेश भोईर, शत्रुघ्न भोईर, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्यासह आणखी काही अनोळखी व्यक्ती हातात छोट्या तलवारी, लोखंडी रॉड घेऊन आले. तिथे येताच गप्पा मारणाऱ्या चव्हाण यांच्यासह इतरांना बेदम मारहाण केली.

Dombivli
Horrific : पहलगामनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना लक्ष्य; आता मच्छिमारांवर जीवघेणा हल्ला

या प्रकरणी अजय गोलतकर यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तर दुचाकीवरून घरी परतत असताना प्रमोद चव्हाण यांच्यासह चौघांनी अंधारात रस्ता अडवून धारदार हत्याराने हल्ला करत जखमी केल्याची तक्रार मेघराज तुपांगे यांनी केली आहे. या दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करत अजय गोलतकर याच्यासह विरोधी गटातील शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे, या चौघांना अटक केली आहे. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद चव्हाण आणि महेश चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com