
पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपुरातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. नागपुरात शनिवार १० मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विदर्भ पेट्रोल असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतला आहे.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोलपंप धारकांच्या बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत .यामुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात.
डिजिटल पेमेंटच्या काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवल्या. काही प्रकरणांत संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आलीये. व्यवहाराशी संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. या प्रकरणी सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या गुन्ह्याच्या समस्येचे लवकरात लवकर समाधान झालं नाही. तर राज्यात ऑनलाइन पेमेंट बंद करण्याचा विचार संघटनेकडून केला जात आहे.
विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने डिजिटल पेमेंट बंदीचा हा निर्णय घेतलाय. मात्र त्यांचा ग्राहकांवर परिणाम होतोय. डिजिटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाईल, हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जैस्वाल यांच्या नेतृत्वात हे निर्णय घेण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.