India-Pakistan Tention : भारत-पाक युद्ध झालं तर पाकिस्तानचा बजेट किती? रक्कम ऐकून डोक्याला हात लावाल

India-Pakistan War Budget : जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्ध झालं तर त्याची किंमत खूप जास्त असेल. हे अनेक लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. एवढंच नाही तर, युद्धाच्या खर्चाचा अचूक अंदाज लावणं खूप कठीण आहे.
Pahalgam Terror Attack india pakistan war cost
Pahalgam Terror Attack india pakistan war costSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मंगळवारी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचा नाश करण्याची शपथ घेतली. त्यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. सैन्याला स्वतःची कारवाई, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्ध झालं तर त्याची किंमत खूप जास्त असेल. हे अनेक लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. एवढंच नाही तर, युद्धाच्या खर्चाचा अचूक अंदाज लावणं खूप कठीण आहे. कारण ते युद्धाचा कालावधी, तीव्रता आणि व्याप्ती यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते.

मिळालेल्या माहितीनुसार, १९९९च्या कारगिल युद्धाचा भारताला अंदाजे खर्च ५,००० कोटी ते १०,००० कोटी रुपयांच्या दरम्यान होता. त्या काळाच्या संदर्भात ही खूप मोठी रक्कम होती. यामध्ये लष्करी कारवाया, दारूगोळा, रसद, सैनिकांचे पगार आणि इतर संबंधित खर्च समाविष्ट होते. भारतीय हवाई दलाच्या हवाई हल्ल्यांचा अंदाजे खर्च सुमारे २००० कोटी रुपये होता. त्यावेळी सैन्याच्या रोजच्या कारवायांवर सुमारे १०-१५ कोटी रुपये खर्च होता. त्या युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानने शरणागती पत्कारली होती. तर पाकिस्तानने युद्धात खूप कमी खर्च केला होता.

Pahalgam Terror Attack india pakistan war cost
Kashmir Tourism : काश्मिरात अर्थचक्र बिघडलं, उद्योग कोलमडला; पर्यटनाचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट, VIDEO

समजा आता भारताचं पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर भारत या युद्धासाठी दररोज २ हजार कोटी रुपये खर्च करू शकतो. तर पाकिस्तानची ताकत दररोज फक्त ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च करण्याची इतकीच आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान भारतापुढे फार काठ टिकू शकणार नाही. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या मुसक्या चांगल्याच आवळण्यात आल्या आहेत. सिंधू नदीचं पाणी बंद केल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. तसेच आयात निर्यात देखील बंद करण्यात आली आहे.

Pahalgam Terror Attack india pakistan war cost
Baglihar Dam : भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तान हादरला; पाकड्यांवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्ट्राईक, नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com