Kashmir Tourism : काश्मिरात अर्थचक्र बिघडलं, उद्योग कोलमडला; पर्यटनाचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट, VIDEO

Kashmir Tourism industry : पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरात पर्यटनाची अवस्था काय आहे? तिथली अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर तग धरून होती. मात्र आता इथल्या पर्यटन उद्योगाची काय अवस्था आहे. पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून
Kashmir News
Kashmir Tourism Google
Published On

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

काश्मीरचं 'स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. आणि काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला. काश्मीरमध्ये सुमारे 5 लाख लोकं पर्यटनाशी निगडीत व्यावसाय करतात. मात्र हल्ल्यानंतर काश्मीरच्या नागरिकांच्या जीवनावर निराशेची काळी छाया पसरलीय. मोठ्या प्रमाणात पर्यटक हॉटेल आणि विमान प्रवासाचे बुकींग रद्द करत आहेत. याचा थेट फटका स्थानिक लोकांना आणि काश्मीरच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसतोय.

Kashmir News
Ajit Pawar News : 'मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण...'; अजित पवार मनातलं बोलून गेले, पाहा व्हिडिओ

एक वर्षांपूर्वी जी अर्थव्यवस्था केंद्र सरकारच्या मदतीवर तग धरून होती. तिच अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगामुळे सुधारू लागली होती.

पर्यटनामुळे काश्मीरचे रुपडं पालटलं होतं. ते कसं पाहूयात..

काश्मीरचा आत्मा पर्यटन व्यवसाय

2024-25 मध्ये काश्मीरचा विकास दर 7 टक्क्याहून अधिक

काश्मीरचे एसजीडीपी 2.65 लाख कोटींवर

दरडोई उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढून, दीड लाख रुपयांवर

Kashmir News
Maharashtra Politics : राज ठाकरेंच्या खास माणसाचे मोजके शब्द; ठाकरे बंधू एकत्र येण्याचं कोडं उलगडलं

पर्यटनामुळे बेरोजगारीचा दरही घटला

2020 मध्ये पर्यटकांची संख्या 34 लाखांवर

2023 मध्ये जम्मू- काश्मीरमध्ये 2.11 कोटी पर्यटक

2024 मध्ये 2.36 कोटींवर विक्रमी पर्यटक संख्या

काश्मीरमधील पर्यटन उद्योगाची उलाढाल 12 हजार कोटींवर

Kashmir News
Rahul Gandhi News : राहुल गांधींवर शंकराचार्य अविमुक्‍तेश्वरानंद भडकले; हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची केली घोषणा

वैष्णो देवी आणि अमरनाथ यात्रा तसेच इतर ठिकाणांच्या पर्यटनासाठी देश आणि विदेशातील पर्यटकांची वर्षभर काश्मिरात रेलचेल असते. मात्र पहलगाम हल्ल्यानं हे चित्र बदलले आहे. काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढल्यास भारत 2030 पर्यंत 56 अब्ज डॉलर विदेशी चलन पर्यटनातून मिळवू शकतो. मात्र सध्यातरी हे स्वप्न वास्तवात उतरणे कठीण आहे. कारण भारत-पाक दरम्यान सध्या युद्धाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या नंदनवनात पर्यटकांची पाऊल कधी वळणार? याबाबत अनिश्चितता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com