Indian Economy : चिंताजनक! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; शेअर मार्केटही धडाम

Stock market today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट धडाम झालेय. सेन्सेक्स आणि निफ्टी तर कोसळलेच, पण डॉलरच्या तुलनेत रूपयाचीही ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Share Market
Share Market Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरणSaam tv
Published On

Stock Market Opening Latest Update 13 January 2025: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह सुरूवात झाली. डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. तर शेअर मार्केटमध्येही मोठी घसरण पाहयला मिळाली. निफ्टी, सेन्सेक्समध्ये सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास ८०० अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीही २२५अंकांच्या घसरणीसह उघडला.

सलग चौथ्या दिवशी रूपयाची किंमत घसरली, आजही ०.५ पैसांनी रूपया घसरल्याचे दिसले, डॉलरच्या तुलनेत रूपया नीचांकी 86.27 इतका घसरलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ८५.९३२५ च्या मागील विक्रमी नीचांकी पातळी ओलांडली. दरम्यान, रुपयाची ही घसरण सलग दहावी साप्ताहिक घसरण नोंदवली गेली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ही मोठी घसरण झाल्याने, भारतीय रुपयाची ही ऐतिहासिक घसरण झाली आहे.

Share Market
Sambhajinagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईनेही सोडले प्राण; अवघ्या ९ तासात मायलेकाचा मृत्यू

शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला. ३० शेअर्सपैकी २९ शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली, एक शेअर्समध्ये वाढ होती. निफ्टीही २२५ अंकांनी घसरणीसह उघडला. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी फक्त दोन शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली, तर तब्बल ४८ शेअर्स घसरले. NSE सेक्टोरल इंडेक्समध्ये रियल्टी सेक्टरमध्ये जास्त घसरण पाहायला मिळाली. धातू, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.

सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी घसरून सुरू झाला, तर निफ्टीतही 225 अंकांची घसरण झाली. बँक निफ्टीने 460 अंकांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 236 अंकांनी घसरून 23,195 वर सुरू झाला, तर बँक निफ्टी 470 अंकांनी खाली येऊन 48,264 वर उघडला. चलन बाजारात रुपयाची किंमत 24 पैशांनी कमी होऊन 82.21/$ या स्तरावर पोहोचली, जो त्याचा नवीन विक्रमी नीचांक आहे.

कोण कोणते शेअर्स कोसळले ?

इंडसइंड बँक आणि अ‍ॅक्सिस बँक वगळता निफ्टीवरील इतर सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. बीपीसीएल, पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, एम अँड एम आणि बीईएल या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक गडगडले. तसेच, एशियन पेंट्स, टाटा स्टील, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.

Share Market
Stock Market Crash : शेअर बाजार धडाधड कोसळलं; सेन्सेक्स ११०० अंकांनी घसरला, कोणते १० स्टॉक ठरले टॉप लूजर्स?

जागतिक बाजारात काय स्थिती ?

आठवड्याच्या सुरूवातीला जागतिक बाजारातही घसरण झाल्याचे दिसून येत आहे. चीनमधील शांघाय कंपोझिट इंडेक्स 0.45% च्या घसरणीसह व्यवहार करत आहे. जपानचा निक्केई देखील 1.005% ने घसरला आहे. कोरियाचा कोस्पी 1.521% घसरला. 10 जानेवारी रोजी अमेरिकेचा डाऊ जोन्स 1.63% घसरला आणि 41,938 वर बंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com