Sambhajinagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईनेही सोडले प्राण; अवघ्या ९ तासात मायलेकाचा मृत्यू

Sambhajinagar Soygaon News : पांडुरंग गवळी हे काही दिवसांपासून आजारी होते. याच आजारपणात पांडुरंग गवळी यांची प्रकृती अधिक खालावली. ११ जानेवारीला सायंकाळी पांडुरंग गवळी यांचे निधन झाले
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : आजारी असल्याने उपचार सुरू असताना एका इसमाचा मृत्यू झाला. मात्र आपल्या आजारी मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी आईच्या कानावर पडली असता हे दुःख ती सहन करू शकली नाही. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने अवघ्या नऊ तासातच जन्मदात्या आईने देखील आपलीये प्राण सोडले. हि घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील तिडका या गावात घडली.  

संभाजीनगर जिल्ह्यातील तिडका या गावातील पांडुरंग नामदेव गवळी (वय ४७) व निर्मलाबाई नामदेव गवळी (वय ७०) असे मृत झालेल्या मायलेकांचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग गवळी हे काही दिवसांपासून आजारी होते. याच आजारपणात पांडुरंग गवळी यांची प्रकृती अधिक खालावली. या दरम्यान ११ जानेवारीला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पांडुरंग गवळी यांचा मृत्यू झाला. 

Sambhajinagar News
Pune Metro : चोरट्यांचा प्रताप, चक्क पुणे मेट्रोच्या खांबांची चोरी, ६ जणांना ठोकल्या बेड्या

बातमी एकताच प्रकृती खालावली 

आपला आजारी मुलगा पांडुरंग याच्या मृत्यूची बातमी आई निर्मला गवळी यांना कळाली. मुलाचं निधन झाल्याची बातमी ऐकत असताना तिला जबर धक्का बसला. यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली. पांडुरंग गवळी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना गोदेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गोदेगाव येथील खाजगी रुग्णालयात निर्मलाबाई यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. 

Sambhajinagar News
New Mahabaleshwar: साताऱ्यामध्ये तयार होणार नवीन महाबळेश्वर, MSRDC ने तयार केलाय प्लॅन; कसा असेल प्रोजेक्ट?

मुलावर अंत्यसंस्कार होत असतानाच आईने सोडला प्राण 

दरम्यान ४७ वर्षीय मुलाच्या निधनाच्या धक्क्यातून आईने नऊ तासात प्राण सोडले. इकडे मुलावर अंत्यसंस्कार होत असताना आईने रुग्णालयात प्राण सोडले. दरम्यान निर्मलाबाई गवळी यांच्यावर रविवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. नऊ तासाच्या अंतराने मायलेकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे तिडका गावात शोककळा पसरली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com