.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : आज मंगळवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. आज मंगळवारी सेन्सेक्स ११०६.५४ अंकांनी म्हणजे १.२८ टक्क्यांनी घसरून ८०,६४२ वर पोहोचला. तर निफ्टी ५० इंडेक्स ३४२.३० अंकांनी १.३९ टक्क्यांनी घसरून २४,३२५.९५ वर पोहोचला. निफ्टी ५० चे ४६ शेअर धडाधड कोसळले. तर ४ शेअर काही प्रमाणात फायद्यात होते. श्रीराम फायनान्स ४ टक्क्यांनी घसरला. तर भारती एअरटेलचा शेअर ३ टक्क्यांनी घसरला. RILचा शेअर १ टक्क्यांहून अधिक घसरला. तर टीसीएसचा शेअर २ टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं.
बीएसई सेन्सेक्सचे टॉप ३० शेअरपैकी २६ शेअरमध्येही मोठी घसरण दिसून आली. तर इतर ४ शेअरने उसळी घेतली. टीसीएस, एचडीएफसी बँक, RIL आणि नेस्लेचे शेअर धडाधड कोसळले. शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे बीएसई मार्केट कॅपमध्ये २.३३ लाख कोटींनी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे बीएसई मार्केट कॅप २५७.७३ लाख कोटी रुपयांवर घसरला.
फेडरल रिझर्व्ह बँकेच्या उद्या होणाऱ्या धोरणावरील बैठकीमुळे गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कपात होण्याची आशा आहे.
चीनी शेअर बाजाराची सुरुवात हळूवार सुरु आहे. शेअरच्या विक्रीत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनमधील मंदीचा जगावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतातील धातू, उर्जा आणि ऑटो मोबाईल क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे.
डॉलर इंडेक्स १०६.७७ वर स्थिर आहे. परंतु या वर्षी ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. डॉलर मजबूत स्थितीत असल्याने परदेशातील गुंतवणूकदार भारतीय इक्विटीमध्ये गुंतणूक करण्यास कमी आकर्षित होत आहे.
नोव्हेंबरमध्ये भारतीय वस्तू व्यापारात घट होऊन ३७.८४ बिलियन डॉलरच्या उच्च पातळीवर पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात २७.१ बिलियन डॉलर होता. कारण देशातील आयात वाढल्याने निर्यातीत घसरण दिसून आली होती.
मंगळवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारांमधील घसरणीमुळे आता व्यापारी आठवड्याच्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीसाठी तयार झाले आहेत. यू.एस. फेडरल रिझर्व्ह बँकेद्वारे व्याजदार कपात होण्याची शक्यता आहे.
श्रीराम फायनान्सचे शेअर ४.४४ टक्क्यांनी घसरून ३००० रुपयांवर पोहोचला. पिडिलाइट शेअर ३.१६ टक्क्यांनी घसरला. भारती एअरटेलचे शेअर देखील ३ टक्क्यांनी घसरला. एल अँड टी फायनान्सचा शेअर देखील ३.१० टक्क्क्यांनी घसरल्याचे दिसून आले.
ऑइल इंडियाचे शेअर ३ टक्क्यांनी घसरला. एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे शेअर २.६८ टक्क्यांनी घसरला. ब्लू स्टारचे शेअर ३.४६ टक्के, बीएनबी हाऊसिंग फायनान्स शेअर २.९० टक्क्यांनी घसरला. तर ज्योति लॅब्सचे शेअरमध्ये ३ टक्क्यांनी घसरला. तर महानगर गॅसचा शेअर ३ टक्क्यांनी घसरून व्यवहारात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.