Shocking : शारीरिक संबंधादरम्यान जिम ट्रेनरच्या पत्नीचा मृत्यू? त्या रात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

shocking Tamilnadu : शारीरिक संबंधादरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याचा जिम ट्रेनरचा दावा आहे. मात्र, पत्नीच्या कुटुंबीयांनी जिम ट्रेनरचा दावा फेटाळला आहे.
shocking
shocking Bengaluru Saam tv
Published On

तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातील एका ३४ वर्षीय जिम ट्रेनरला ताब्यात घेण्यात आलं आहे. जिम ट्रेनरला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं आहे. शारीरिक संबंधादरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोपीचा दावा आहे. भास्कर एक जिम ट्रेनर आहे. तो एकूण ४ जिमचा मालक असून त्याची पत्नी शशिकला देखील महिलांसाठी एक जिम चालवते. दोघांना चार वर्ष आणि दोन वर्षांची मुले आहेत.

shocking
Pahalgam Attack : पाकिस्तानच्या इस्लामाबादवर भारताचा कब्जा? बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

मीडिया रिपोर्टनुसार, बेंगळुरूत प्ले स्कूल चालवताना शशिकला भास्करच्या प्रेमात पडली. दोघांनी २०१८ साली लग्न केलं. शशिकलाला भास्करचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायचं. भास्करने ३० एप्रिल रोजी शशिकला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी शशिकलाच्या नाकातून रक्त वाहत होतं. तर शारीरिक संबंधादरम्यान शशिकला बेशुद्ध झाल्याचे भास्करने रुग्णालयात सांगितले.

shocking
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे संजय राऊतांना काडीची किंमत देत नाहीत; भाजप नेत्याचा तिखट वार

रुग्णालयात दाखल केलेल्या शशिकलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयाने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयाच्या माहितीनंतर पोलिसांनी रुग्णालयात पोहोचत तपास सुरु केला. पोलिसांना शशिकलाच्या गळ्यावर जखमा आढळल्या. शशिकलाचा गळा दाबल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पुढील तपासासाठी शशिकलाचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.

shocking
Seema Haider : सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

पोलीस चौकशीत भास्करने सांगितलं की, 'त्याने आणि शशिकलाने दारू प्यायली होती. त्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंधादरम्यान शशिकलाचा मृत्यू झाला.' शशिकलाचे वडील आणि नातेवाईकांनी भास्करचा दावा फेटाळून लावला. शशिकलाच्या पित्याचा आरोप होता की, 'भास्करला १४ लाख रुपयांचा हुंडा हवा होता. त्यासाठी भास्कर शशिकलाचा छळ करायचा'.

shocking
Nashik Accident : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; भीषण अपघातात भावासमोर बहिणीने जीव सोडला

'दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. भांडणानंतर त्याने तिची हात-पाय बांधून हत्या केली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. मला फोन करून मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. भास्कर माझ्या मुलीला नेहमी मारायचा. आम्ही याआधी दोन वेळा रुग्णालयात दाखल केले आहे. आम्ही मारहाण प्रकरणी पोलिसांतही तक्रार दिली आहे, असे शशिकलाच्या वडिलांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com