
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. 'संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. उद्धव ठाकरेदेखील त्यांना काडीची किंमत देत नाहीत, असे म्हणत अतुल भातखळकरांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
अतुल भातखळकर यांनी पोईसर नदीच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही पाहणी पार पडली. १५ मेपूर्वी नदीतील गाळ काढून नदी रुंदीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदार भातखळकर यांना दिली. यामुळे कांदिवलीतील हनुमान नगर परिसरात पूर येण्याचा धोका कमी होईल आणि नागरिकांना पूरस्थितीपासून दिलासा मिळेल, असा विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकेला उत्तर देताना भातखळकर म्हणाले, 'संजय राऊत आधी कंपाउंडरकडून औषध घेत होते, आता त्यांनी तीही घेणं बंद केलं आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे'.
'संजय राऊत यांचे नवीन मालक राहुल गांधी आहेत. राहुल गांधींनीसुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्यामुळे संजय राऊत यांना फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, अशी टीका भातखळकरांनी केली. आता या टीकेला ठाकरे गट आणि संजय राऊत काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील पठाण चाळ येथे STPच्या कामाकरिता पोईसर नदीच्या प्रवाहात घातलेला भराव आणि पोईसर येथील रेल्वे ब्रिजच्या कामाकरिता रेल्वेने घातलेला भराव १५ मेपूर्वी दूर करा अन्यथा STPचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा भातखळकर यांनी कामांच्या पाहणी करताना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.