Seema Haider : सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Seema haider News : पाकिस्तानातून प्रियकरासोबत भारतात आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवलंय...होय, सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवून दिल्याचा दावा करण्यात आलाय...मात्र, खरंच सीमाला पाकिस्तानात पाठवलंय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Seema haider News
Seema haider Saam tv
Published On

सीमा हैदर मला पाकिस्तानात पाठवू नका अशी विनंती मोदी आणि योगींना करतेय. मात्र, याच सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठण्यात आलंय, असा दावा करण्यात आलाय.

सीमा हैदर आपल्या पतीला सोडून भारतात आली खरी मात्र, आता तिला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय...कारण, सीमा ही पाकिस्तानातून आल्याने केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिला भारत देश सोडावा लागलाय...असा दावा आता करण्यात येतोय.

मात्र, खरंच सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं का...? सीमा एकटीच पाकिस्तानात गेली की तिच्यासोबत तिच्या 4 मुलांनाही पाठवलं...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यातच आता भारतात सचिन मीणाशी लग्न केल्यानंतर तिला आणखी एक मुलगी झालीय...त्यामुळे खरंच सीमा पाकिस्तानात गेली का...? याची आम्ही पडताळणी केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात..

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, 'पाकिस्तानातून पतीला सोडून भारतात प्रियकरासोबत पळून आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवलं.सीमा ही पाकिस्तानी असल्याने केंद्राच्या आदेशानंतर तिला पाकिस्तानात पाठवलं'.

Seema haider News
Maharashtra Politics : दहशतवादाविरोधात एकत्र या; प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरातांना आवाहन, मविआ काय भूमिका घेणार?

हा मेसेज व्हायरल होतोय...तसंच केंद्राच्या आदेशानंतर सीमा हैदरचं काय होणार...? असे प्रश्नही सोशल मीडियावर विचारले जातायत...काहींनी तर सीमाला पाकिस्तानात पुन्हा पाठवा अशी मागणी केली...तर काही जण म्हणतायत सीमा आता भारताची सून झालीय त्यामुळे तिला इथेच राहूदेत...मात्र, खरंच सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात गेलीय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही सीमाच्या पतीशी संपर्क साधला...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

Seema haider News
Viral Video : रस प्यायला ये म्हणलं माय! बैलाने चालवली धूम स्टाईल स्कुटी; 32 सेकंदाचा व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल

व्हायरल सत्य काय?

2023 साली सीमा प्रियकरासाठी भारतात पळून आली

नेपाळमार्गे भारतात येताना सीमा बेकायदेशीर भारतात घुसली

व्हिसाशिवाय सीमाचा बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश

सीमाच्या नागरिकत्वाचा मुद्दा भारतात न्यायप्रविष्ठ

सरकारने जारी केलेले आदेश सीमाला लागू होत नाहीत

पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्यांनाच केंद्राचे आदेश लागू

Seema haider News
Shocking : ७ वर्षांच्या नरेंद्रनं डोक्यावर मायेनं हात फिरवला, पिसाळलेल्या कुत्र्यानं जबडाच फाडला; १५-२० फूट फरफटत नेलं

त्यामुळे सध्या तरी सीमाला पाकिस्तानात पाठवलं जाणार नाही...कारण, तिचा खटला सुरू आहे...निकाल आल्यानंतरच तिच्याबाबत निर्णय होईल...त्यामुळे सध्या तरी सीमा ही भारतातच राहू शकते...आमच्या पडताळणीत सीमाला पाकिस्तानात पाठवल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com