Viral Video : रस प्यायला ये म्हणलं माय! बैलाने चालवली धूम स्टाईल स्कुटी; 32 सेकंदाचा व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल

bull ride scooty viral video : ऋषिकेशमध्ये बैलाने धूम स्टाईल स्कुटी चालवली. तुम्ही 32 सेकंदाचा व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल.
 viral video
bull ride scooty viral video :Saam tv
Published On

तुम्ही रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी चोरी गेल्याच्या अनेक घटना ऐकल्या आणि वाचल्या असतील. दुचाकी चोरीच्या मागे कोणत्यातरी व्यक्तीचा हात असतो. बहुतांश चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास कार किंवा बाईक चोरून फरार होता. मात्र, उत्तराखंडच्या ऋषिकेशमधून अजब प्रकरण समोर आलं आहे. एका बैल स्कुटी घेऊन पळत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे. सोशल मीडयावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जणू बैलच स्कुटी चालवत असल्याचे भासत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया 'एक्स'वरील भूपी पंवर नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कॅप्शन लिहिलं आहे की, 'तुम्ही चोरट्यांकडून स्कुटी चोरीच्या घटना ऐकल्या असतील. मात्र, ऋषिकेशमधील एका गल्लीत बैलाने स्कुटी पळवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ३२ सेकेंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 viral video
Chhaya Kadam : छाया कदम गोत्यात; रानडुक्कर, घोरपड खाणं पडलं महागात, प्रसिद्धी अभिनेत्री चौकशीच्या फेऱ्यात?

व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसत आहे?

रस्त्यावरून २-२ लोक जात आहेत. त्यांच्या बाजूने एक बैल देखील जाताना दिसत आहे. मात्र, हा बैल पांढऱ्या रंगाची स्कुटी पाहून थांबतो. लोक लांब जाताच स्कुटी घेऊन पळून जातो. सीसीटीव्हीमध्येही बैल सहज स्कुटी पळवताना दिसत आहे. बैल स्कुटी पळवून एका खांबाजवळ नेऊन लपवतो. काही सेकंद स्कुटी लपवली. त्यानंतर तिथेच उभा राहिला. बैलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 viral video
Shocking : ७ वर्षांच्या नरेंद्रनं डोक्यावर मायेनं हात फिरवला, पिसाळलेल्या कुत्र्यानं जबडाच फाडला; १५-२० फूट फरफटत नेलं

व्हायरल व्हिडिओवर एकाने म्हटलं की, 'मी असा प्रकार पहिल्यांदा बघितला आहे'. तर दुसऱ्याने म्हटलं की, 'त्याचा स्कुटी चोरी करण्याचा विचार नसेल, तर त्याचा दुसरा प्लान असेल'. अनेक जण हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com