PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

PoK Protest News: गव्हाचे पीठ आणि विजेच्या वाढलेल्या किमतीच्या विरोधात निदर्शने करणारे नागरिक आणि सुरक्षा दलामध्ये तीव्र संघर्ष झालाय. येथील नागरिकांनी पाकिस्तान पोलीस आणि आंदोलकांच्या संघर्षात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय.
PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी
PoK Protest News

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये महागाईविरोधात केलं जाणारं आंदोलन तापलंय. गव्हाचे पीठ आणि विजेच्या वाढलेल्या किमतीच्या विरोधात निदर्शने करणारे नागरिक आणि सुरक्षा दलामध्ये तीव्र संघर्ष झालाय. येथील नागरिकांनी पाकिस्तान पोलीस आणि आंदोलकांच्या संघर्षात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय. तर १०० हुन अधिक जण जखमी झालेत.

डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,पाकव्याप्त काश्मिरमध्ये चाका जाम आणि शटर-डाउनचा संप झाला. शनिवारी हे आंदोलन तीव्र झालं यादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला, यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय. मिरपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) कामरान अली यांनी डॉन डॉट कॉमला याबाबत माहिती दिली.

कोटली आणि पूंछ मार्गे मुझफ्फराबादकडे निघालेल्या रॅलीच्या बंदोबस्तासाठी इस्लामगढ शहरात पोलीस कर्मचारी तैनात होते. जम्मू काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) द्वारे ही रॅली काढण्यात आली होती. याच दरम्यान उपनिरीक्षक अदनान कुरेशी यांचा छातीत गोळी लागल्याने मृत्यू झाला.

शनिवारी मुझफ्फराबादच्या दिशेने लाँग मार्च काढणाऱ्या आंदोलक आणि JAAC कार्यकर्त्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकत पोलिसांनी सुमारे ७० आंदोलकांना अटक केली. पोलिसांनी मुझफ्फराबाद आणि मीरपूर विभागात छापे टाकली होते. यानंतर गुरुवारी दड्यालमध्ये गंभीर पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष उफाळून आला.

त्यानंतर समितीने शुक्रवारी बेमुदत काम बंद आणि चाक आंदोलन पुकारले. शुक्रवारी संपाच्या दरम्यान पीओकेची राजधानी मुझफ्फराबादच्या विविध भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक उडाली. शनिवारी अधिकाऱ्यांनी मुझफ्फराबादकडे जाणाऱ्या मार्गांमध्ये मातीचे ढिगारे ठेवले आणि आंदोलकांना राजधानीत जाण्यापासून रोखले.

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी
Afghanistan Flooding: अफगाणिस्तानात पुराचा हाहाकार; ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू,१००० घरांचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com