Afghanistan Flooding: अफगाणिस्तानात पुराचा हाहाकार; ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू,१००० घरांचे नुकसान

Floods in Afghanistan : अफगाणिस्तानात अचानक आलेल्या पुरामुळे ३०० हुन अधिक लोकांचा मृत्यू झालाय. पुराच्या पाण्याने १ हजाराहून अधिक घरांचं नुकसान झालंय.
Afghanistan Flooding: अफगाणिस्तानात पुराचा हाहाकार; ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू, १००० घरांचे नुकसान
Floods in Afghanistan AP News
Published On

अफगाणिस्तानात अचानक आलेल्या पुरामुळे ३०० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला. या काळात बगलान प्रांतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झालाय. पुराच्या पाण्याने १ हजाराहून अधिक घरांचे नुकसान झालं आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न संघटना पूरग्रस्तांना मदत करण्यात गुंतलेली आहे. वृत्तसंस्था एपी दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र अन्न संस्थेने माहिती दिलीय. अफगाणिस्तानमध्ये असामान्यपणे मुसळधार पावसामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर १००० हून अधिक घरे उद्ध्वस्त झालीत.

वर्ल्ड फूड प्रोग्रामने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत अफगाणिस्तानात आलेल्या अनेक पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना ते फोर्टिफाइड बिस्किटांचे वाटप करण्यात येत आहेत. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिलीय की, शेजारच्या तखार प्रांतात पुरात किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, बदख्शान, बागलान, घोर आणि हेरात प्रांतामध्ये पुरामुळे नुकसान झालंय.

"पावसामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. तालिबान सरकारने लोकांना वाचवण्यासाठी, जखमींना नेण्यासाठी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी सर्व उपलब्ध साधनसामग्री एकत्रित करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, हवाई दलाने आधी बगलानमधील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे. तसेच पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. त्यापैकी १०० जखमींना परिसरातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये देशात अतिवृष्टी आणि पुरामुळे किमान ७० जणांचा मृत्यू झाला होता. सुमारे २,००० घरे, तीन मशिदी आणि चार शाळांचेही नुकसान झाले.

Afghanistan Flooding: अफगाणिस्तानात पुराचा हाहाकार; ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू, १००० घरांचे नुकसान
Earthquake in Afganisthan : अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाने हादरला, ४.२ रिश्टर स्केलचे झटके

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com