Pakistan Shocking News: अबब! पाकिस्तानच्या भिकाऱ्याकडे सापडले तब्बल 5 लाख, पासपोर्टवर जायचा सौदीला

पाकिस्तानात चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. एका वृध्द भिकऱ्याकडून 5 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. वृध्द भिकारी बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडला होता.
Shocking News
Shocking NewsSaam Tv
Published On

पाकिस्तानात रस्त्याच्या कडेला एक वृध्द भिकारी बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या खिशातून लाखों रुपये मिळाले आहेत. एवढंच नाही तर त्याच्याकडे चक्क पासपोर्टही मिळाला आहे. बऱ्याच वेळा हा वृध्द भिकारी सौदी अरेबियला जात असल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानातली ही चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. एका वृध्द भिकऱ्याकडून 5 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. वृध्द भिकारी बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडला होता. बचावकार्याची टीम घटनास्थळी पोहचली. आणि त्या वृद्ध व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाताना त्याच्या खिशातून 5 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली.

Shocking News
Dadar Railway Station: दादर स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, चंद्रशेखर आझाद यांची संसदेत मागणी

पाकिस्तानचे न्यूज चॅनल जिओ च्या म्हणण्यानुसार, हा भिकारी पंजाबच्या सरगोधा जिल्ह्याचा रहिवासी असून तो खुशाब रोडवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना त्याच्या खिशातून एकूण 5 लाख 34 हजार रुपये मिळाल्याचं बचावकार्य करणाऱ्या टीमने सांगितलं.

खूप वेळा वृध्द भिकारी सौदी अरेबियाला गेल्याच उघड

भिकारीकडे एक पासपोर्ट सापडला आहे. यावरून असं लक्षात येतेय की बऱ्याच वेळा सौदी अरेबियाला जाऊन भीक मागत असावा. स्थानिक अधिकाऱ्याच्या माहितीवरून एक अनोळखी फोन आला आणि वृध्द भिकारीला मदत करण्यासाठी बचाव कार्याची टीम घटनास्थळी पोहचली. स्थानिक लोकांनी सांगितलं की भिकारी याच परिसरात भीक मागत होता. जेव्हा तो पूर्णपणे बरा झाला तेव्हा घरी जाताना त्याला त्याचे पैसे आणि सामान देऊन सोडण्यात आलं.

Shocking News
Wayanad Landslides Update: मृत्यूची दरड! वायनाड भूस्खलनातातील मृतांचा आकडा २५६ वर, २०० जण अजूनही बेपत्ता

हज यात्रेसाठी बरेच पाकिस्तानी सौदी अरेबियाला जाऊन भीक मागतात.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानी नागरिक हज यात्रेच्या निमित्ताने सौदी अरेबियाला भीक मागण्यासाठी जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या.मोठ्या संख्येने भिकारी मानवी तस्करीच्या माध्यमातून परदेशात जात असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पाकिस्तानी सिनेटला सांगितलं आहे.

90 टक्के भिकारी हे पाकिस्तानातले आहेत. इराक आणि सौदी अरेबियाच्या सचिवांनी असाही खुलासा केला आहे की अश्या भिकारींना पकडून तुरुंगामध्ये टाकल्याने त्याचे तुरुंग भरले आहेत. सौदी अरेबियात 'मस्जीत अल हराम ' पवित्र मशीद मानली जाते. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून पाकीटमार, भिकारी यांना अटक केली आहे. त्यात जास्त लोकं ही पाकिस्तानातले आहेत. हीच लोकं भीक मागण्यासाठी हज यात्रेच्या निमित्ताने सौदी अरेबियाला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com