मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मुंबईतील इतर रेल्वे स्टेशनची नावं बदलण्यात आली तसंच दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भीम आर्मीसह अनेक संघटनांकडून केली जात आहे. आता हा मुद्द थेट संसदेपर्यंत पोहचला आहे. भीम आर्मी प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी लोकलभेत हा मुद्दा उपस्थित केला.
महाराष्ट्र भीम आर्मी तसेच विविध संघटनांनी दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे ही मागणी केली होती. यासाठी या संघटनांनी अनेकदा आंदोलनं देखील केली आहेत. अशामध्ये आता या मागणीला खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसदेत वाचा फोडली. चंद्रशेखर आझाद यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भीम आर्मीचे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वे स्टेशन नामांतरासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी अशोक कांबळे यांनी खासदार चंद्रशेखर आझाद यांना पत्र पाठवत ही मागणी संसदेत करावी, अशी विनंती केली होती. अशोक कांबळे यांच्या विनंतीला मान देत चंद्रशेखर आझाद यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. आंबेडकरी जनतेचा आवाज संसदेत उचलल्याबद्दल चंद्रशेखर आझाद यांचे आभार मानले जात आहे.
दादरमध्ये चैत्यभूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी चैत्यभूमीला राज्यासह देशभरातील अनेक जण येत असतात. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांसह भीम आर्मीच्या वतीने या रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मगणी करण्यात येत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने देखील ही मागणी लागून धरली आहे. यासाठी या संघटनांकडून बऱ्याचदा आंदोलनं देखील करण्यात आली. पण याची दखल अद्याप घेतली गेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.