India military response, Pahalgam attack retaliation : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची तयारी सुरू केली. भारताने आधीच वॉटर स्ट्राईक अन् पाच करार रद्द करत पाकिस्तानची कोंडी केली. त्यात आता भारताकडून आणखी आक्रमक पावले उचलण्याची तयारी करण्यात येत आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. त्यानंतर संरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतही दीर्घ चर्चा झाली. आज ११ वाजता पंतप्ऱधान नरेंद्र मोदी सीसीएची बैठक होणार आहे. या बैठकीत दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. भारतामधील हालचालींना वेग आल्यानंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आली आहे. घाबरलेल्या पाकिस्तानने भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, असे म्हटले आहे.
२२ एप्रिल रोजी दहशतवाद्याने पहलगाममध्ये निष्पाप २८ पर्यटकांचा जीव घेतला. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचलाय. भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाईचा इशारा देत तयारी सुरू केली आहे. भारताचे आक्रक रूप पाहून पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनी बुधवारी भारत हल्ला करू शकतो, असा दावा केला. ते म्हणाले की भारत पुढील २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करू शकतो.
तरार यांनी रात्री २ वाजता पत्रकार परिषद घेऊन भीती व्यक्त केली. भारत २४ तासांत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, अशी माहिती पाकिस्तानकडे विश्वसनीय गुप्तचरकडून मिळाली आहे. भारत पहलगाम हल्ल्याचा खोटा बहाना करून सैन्य कारवाईची योजना आखत आहे. तरार यांनी आंतरराष्ट्रीय देशांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेय. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला पाकिस्तान ठाम आणि निर्णायक प्रत्युत्तर देईल, असा पोकळ इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भारत सैन्य हल्ला नक्कीच करणार आहे. पाकिस्तान प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. वेळ पडली तर अण्वस्त्राचा वापर केला जाईल. पाकिस्तानने आपल्या सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनीही यापूर्वी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. दोन्ही अण्वस्त्र असणाऱ्या देशांमधील तणाव अधिक बिघडत आहेत, त्यामुळे युद्धाची शक्यता टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मध्यस्थी करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.
पहलगाम हल्ल्यातील सहभाग पाकिस्तानने नाकारला आहे. पाकिस्तानकडून तटस्थ तपास समितीमार्फत पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली आहे. भारताने या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सैन्यदलांना तयारीचे संकेत दिले आहे. योजना आणि वेळ तुम्ही ठरवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिन्ही लष्कराच्या प्रमुखांना सांगितलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना कोणत्याही कानाकोपऱ्यातून शोधून धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.